Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

धोलेरात होणार नवे ग्रीनफिल्ड विमानतळ

गुजरातेत होणार नवे विमानतळ

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
June 15, 2022
in आजचा भारत
0
धोलेरात होणार नवे ग्रीनफिल्ड विमानतळ

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने, गुजरातमध्ये धोलेरा येथे नवे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. यासाठी 1305 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 48 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
हा प्रकल्प ‘DIACL म्हणजेच धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी मर्यादित’मार्फत साकारला जाणार आहे. DIACL ही भारतीय विमानतळ प्राधिकरण, गुजरात सरकार आणि NICDIT अर्थात राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकसन आणि अंमलबजावणी न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने अस्तित्वात आलेली कंपनी आहे. DIACL मध्ये या तिघांच्या हिश्श्याचे प्रमाण 51:33:16 असे आहे.


DSIR अर्थात धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रातून प्रवासी आणि कार्गोची आवक-जावक धोलेरा विमानतळामार्फत होणार असून, सदर औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरेल असे प्रमुख कार्गो वाहतूक केंद्र म्हणून धोलेरा नावारूपाला येण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादसाठी आणि जवळच्या अन्य भागांसाठी दुसरा/पर्यायी विमानतळ म्हणूनही या विमानतळाचा उपयोग होऊ शकणार आहे.
हा धोलेरा येथील नवा ग्रीनफिल्ड विमानतळ अहमदाबादपासून 80 किमी इतक्या हवाई अंतरावर असेल. वर्ष 2025-26 पासून हा विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रारंभी दरवर्षी 3 लाख प्रवासी येथून प्रवास (आगमन-निर्गमन मिळून) करण्याचा अंदाज आहे. तर आगामी 20 वर्षांत येथून प्रवास करणाऱ्या (आगमन-निर्गमन मिळून) प्रवाशांची संख्या 23 लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वर्ष 2025-26 पासून वार्षिक कार्गो आवक-जावक 20,000 टन होण्याचा अंदाज असून आगामी 20 वर्षांत कार्गो आवक-जावक 2,73,000 टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Tags: dholeragujratindiamodisarkarnewairport
Previous Post

मोदींच्या हस्ते देहूत तुकाराम महाराज शीळा मंदिराचा जीर्णोद्धार

Next Post

भारत-युरोपीय महासंघात वाटाघाटी सुरू

Next Post
भारत-युरोपीय महासंघात वाटाघाटी सुरू

भारत-युरोपीय महासंघात वाटाघाटी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In