मॉस्को : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांची डिसेंबर, 2021 मध्ये भारतात चर्चा झाली होती. त्यातील बाबींचा उभय नेत्यांनी आढावा घेतला. विशेषत: कृषी उत्पादने, खते आणि औषध उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापाराला आणखी प्रोत्साहन कसे देता येईल यावर त्यांनी विचार विनिमय केला.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि खाद्यपदार्थ बाजारपेठेच्या स्थितीसह जागतिक समस्यांवर देखील उभय नेत्यांनी चर्चा केली.
युक्रेनमधील सद्य परिस्थिती संदर्भात, मोदी यांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला.
जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर नियमित सल्लामसलत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.