पुणे : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध सिनेअभ्यासक श्रीकांत नारायण कुलकर्णी यांच्या ‘ओळखीचे चेहरे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच येथील पत्रकार संघात झाले.
” चार-पाच वर्षांपूर्वी ‘प्रीमिअर’ या सिनेनियतकालिकांमध्ये ‘ओळखीचे चेहरे ‘ हे सदर प्रसिद्ध होत होते. त्याचेच हे पुस्तक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ अभिनेते उदय लागू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभात या पुस्तकातील काही ‘ओळखीचे चेहरे ‘ही आवर्जून उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम पेंडसे, अभिनेते श्रीकांत यादव, धनंजय सरदेशपांडे, अभिनेत्री प्रतिभा भगत यांचा समावेश होता. याशिवाय अभिनेते शशांक शेंडे यांच्या सुविद्य पत्नी नीता शेंडे तसेच अभिनेते नितीन धंदुके यांच्या सुविद्य पत्नी ज्योती धंदुके याही उपस्थित होत्या त्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली. याशिवाय सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, साहित्यिका प्रा. मेधा सिधये, ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे, चित्रपटांतील गाण्यांवर मनस्वी प्रेम करणारे रसिक श्री वासुदेवराव देशपांडे, त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा देशपांडे, नारायण फडके मित्रमंडळातील चंद्रकांत कुलकर्णी, अरुण पाटणकर, सौ. पाटणकर, श्रीमती पोतदार आदी उपस्थित होते. धनंजय कुलकर्णी यांनी अतिशय छान सूत्रसंचालन केले. देवश्री कुलकर्णी -पिंपळे आणि रोहित पिंपळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा पुस्तक प्रकाशन सोहळा झाला.
आणखी काही चेहरे आणणार प्रकाशात : कुलकर्णी
आणखी काही चेहरे प्रकाशात आणण्याचा संकल्प श्रीकांत कुलकर्णी यांनी या प्रसंगी बोलून दाखवला.
पुण्यातील प्रतीक प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘ओळखीचे चेहरे ‘ या पुस्तकात नाट्य-चित्रपटसृष्टीतील सुमारे चाळीसहून अधिक सहकलाकारांच्या जीवनप्रवासाचा वेध घेण्यात आला आहे. पुस्तकासाठी श्री प्रवीण जोशी (प्रतीक प्रकाशन) यांच्या संपर्कध्वनीवर (९४२२२३ १८२४९) संपर्क साधता येईल.
कार्यक्रमाची क्षणचित्रे खालील लिंकवर पाहता येतील.







