Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

रेस्टॉरंट चालकांवर लक्ष ठेवण्याचे जिल्हाधिका-यांना निर्देश

सर्व्हिस चार्जमुळे हॉटेलचालक रडारवर

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
July 9, 2022
in आजचा भारत
0
रेस्टॉरंट चालकांवर लक्ष ठेवण्याचे जिल्हाधिका-यांना निर्देश

नवी दिल्‍ली : हॉटेल्स आणि रेस्टॉरंटकडून आकारल्या जाणा-या सेवाशुल्काबाबत ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. याबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी आल्यास, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी तक्रार दाखल करुन तपास करावा आणि त्याचा अहवाल 15 दिवसांत प्राधिकरणाकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.


या मार्गदर्शक सूचनांना व्यापक प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करण्याविषयी देखील, सीसीपीएने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि जिल्हाधिका-यांना पत्र लिहिले आहे. ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी या मार्गदर्शक सूचनांची त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सेवा शुल्क आकारणे हे मार्गदर्शक सूचनांचे स्पष्ट उल्लंघन असून ग्राहकांच्या हितांना बाधा पोहचवणा-या पद्धती सुरू ठेवणे अयोग्य असून अशा तक्रारींची प्राधान्याने दखल घेतली जावी, असेही या पत्रात म्हटले आहे.
सीसीपीएने या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतरच्या काळात, म्हणजे 05 जुलै 2022 ते 08 जुलै 2022 या काळात, प्राधिकरणाला 85 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी, दिल्ली, बंगळूरु, मुंबई, पुणे आणि गाझियाबाद इथून आल्या असून, त्यांची संख्या अनुक्रमे 18, 15, 11,4 आणि 3 इतकी आहे.
जर एखाद्या ग्राहकाला हॉटेल किंवा रेस्टॉरेंटमध्ये सेवाशुल्क आकारले जात असेल, तर ते मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे. ग्राहकांनी अशावेळी ग्राहकांनी हॉटेल किंवा रेस्टॉरेंट मालकांकडे बिलातून हे सेवा शुल्क वजा करण्याची विनंती करावी, किंवा ग्राहक, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक हितांचे संरक्षण खटलापूर्व स्थितीत करणारी ही एक पर्यायी ग्राहक तक्रार निवारण व्यवस्था आहे.
तसेच, ग्राहक आयोगाकडेही या चुकीच्या व्यावसायिक पद्धतीची तक्रार नोंदवता येईल. त्वरित कारवाईसाठी ई-दाखिल पोर्टल www.edaakhil.nic.in वर ई पद्धतीने देखील तक्रार दाखल करता येईल. त्याशिवाय, संबंधित जिल्हाधिका-याकडेदेखील तपासासाठी ही तक्रार नोंदवता येईल. त्याशिवाय, सीसीपीए कडे com-ccpa@nic.in या ईमेल आयडीवरदेखील तक्रार नोंदवता येईल.

Tags: consumerrightshotelserviceindiarestorantservicecharge
Previous Post

ठाण्यात सप्टेंबरमध्ये लष्कर भरती मेळावा

Next Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत

Next Post
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In