नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शिंदे यांनी मोदींना विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली. महाराष्ट्रात रविवारी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विठुमाऊलीही मूर्ती दिल्याने ही बाब चर्चेची ठरली आहे.
उभय नेत्यांनी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय परिस्थीवर आणि मंत्रिमंडळ कधि विस्तार करणार यावर भाष्य केले होते.

पंतप्रधान मोदी यांना भेटून आनंद झाला. आम्ही त्यांच्याशी राज्याच्या विकासाबाबत चर्चा केली. सर्वसामान्य जनतेचे सरकार असून शेतक-यांचे, कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या असे मोदींनी सांगितल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.







