कथाकथी – इंद्रधनुष्य
जुन्या गाण्यांची आवड असलेल्या मुलाला त्याच्यासारखीच एक मुलगी बसमध्ये भेटते. या लाजाळू मुलाला मुलींशी बोलायची सवय नसल्याने तीच बोलण्याची सुरुवात करते आणि त्यांच्यातील संवाद पुढे सरकतो. मात्र, त्यांच्या या भेटीनंतर पुढे काय घडतं? बसमधल्या भेटीनंतर ते पुन्हा भेटतात का? त्यांच्यात पुढे काय घडतं? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ही कथा संपूर्ण ऐका.
लेखकाबद्दल थोडेसे…
गौरांग कुलकर्णी यांनी बी. कॉम. नंतर जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केले आहे. पत्रकारिता करताना त्यांना लिखाणाचा प्रयत्न करायलाही आवडतो. त्यासोबतच त्यांना नाटकाचीही आवड आहे. ते नियमित लिखाण करीत नसले, तरी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून व्यक्त होत असतात.