यज्ञसोहळ्याची तीन पिढ्यांची परंपरा
———————————
वृंदावन – उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये होत आहे. २१ जानेवारी ते चार फेब्रुवारी २०२३ या कालावधीत यज्ञेश्वरशास्त्री सेलूकर यांचा यज्ञ सोहळा होत आहे. त्यात दीक्षित सेलूकर महाराजांचे महाराष्ट्रासह देशभरातील शिष्य सहभागी झाले आहेत. यज्ञस्थळी रोज हवन, मंत्रघोष असे विधी होत असून त्याची दिव्य अनुभूती उपस्थितांना लाभत आहे.

यज्ञेश्वरजींनी यापूर्वी श्रीक्षेत्र गंगोत्री, श्रीक्षेत्र बद्रीनाथ धाम, श्रीक्षेत्र पुष्कर, श्रीक्षेत्र गाणगापूर आदी विविध तीर्थक्षेत्री यज्ञ केले आहेत. काही लाख रुपयांपासून सुरू झालेला महासोमयाग मालिकांचा प्रवास कोटीं रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे.
मराठवाड्यातील दीक्षित श्री सेलूकर तीन पिढ्यांपासून आपल्या आचरणाद्वारे व उपासनेद्वारे यज्ञसंस्था निष्ठापूर्वक संवर्धित करीत आहेत.







