लेणीची हिलरींना पडली भुरळ
—————–
वेरूळ : अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी एक फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी औरंगाबादजवळील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट दिली. खडकांतून अवतलेल्या या सौंदर्याला त्यांनी मनापासून दाद दिली.
हिलरी यांचे बुधवारी सकाळी दहा वाजता वेरूळ येथील १६ व्या क्रमांकाच्या कैलास लेणीत आगमन झाले. या वेळी हिलरी क्लिंटन यांचे भारतीय पुरातत्व विभागातर्फे संवर्धन सहाय्यक राजेश वाकलेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहण्याची त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. करोना संकटापूर्वीच त्यांचा भारतात औरंगाबाद दौऱ्यावर येण्याचा विचार होता, मात्र करोनामुळे ते शक्य झालं नाही..