सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रौपदी मुर्मू
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी त्यांच्या ‘सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती’ या पुस्तकात प्रवाही भाषेत मांडला आहे. मुर्मू यांचं बालपणापासून राष्ट्रपतीपदापर्यंतचं अंतर्मनाचा ठाव घेणारं चरित्र अधोरेखित करणारं हे मराठीतलं पुस्तक आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी तसेच राजकीय अभ्यासक, नेते, कार्यकर्ते आणि जाणकार वाचकांना या पुस्तकातनं मुर्मू यांच्याविषयीची सविस्तर माहिती यात मिळेल.
मुर्मू यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनंत संकटांवर मात करून जीवघेण्या दुःखाच्या आणि नैराश्येच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माचा आश्रय घेतला. आभाळाएवढ्या जीवघेण्या दुःखाचं ओझं पेलत त्यांनी त्यातनं सावरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना अध्यात्मासोबतच त्यांच्या मुलीची – इतिश्रीची भावनिक साथही लाभली. म्हणूनच एक सामान्य शिक्षिका म्हणून आपल्या जीवनाची सुरूवात करणाऱ्या आणि देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहचणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा अतिशय संघर्षमय आणि तेवढाच खडतर प्रवास जाणून घेणं सामान्यजनासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. यात द्रौपदी मुर्मू यांच्या संघर्षमय जीवनगाथेचा प्रवास, त्यांच्या बालपणापासून राष्ट्रपती पदापर्यंतची इत्यंभूत माहिती वाचनीय शैलीत मांडली आहे…
हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच राजकीय विश्लेषक, नेते, कार्यकर्ते आणि सर्व रसिक वाचकांसाठी निश्चितच नवीन दिशा देणारे ठरले आहे…
पुस्तकाचे नाव:
सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रौपदी मुर्मू
एकूण पाने… १३६
किंमत……. ₹ २५०/- (सवलतीत ₹१५० मध्ये)
प्रकाशन…. दुर्वा एजन्सीज्, शुक्रवार पेठ, पुणे
टीप – या पुस्तकाची प्रत मागविण्यासाठी लेखक विनोद पंचभाई यांना 9923797725 या मोबाइलवर संपर्क साधता येईल.
पुस्तकाविषयी अधिक माहिती बघा खालील लिंकवर