नांदेड : माहूरच्या रेणुकादेवीच्या पूजाविधीत तांबूलाचे महत्त्व आहे. देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी तांबूल एक मानला जातो. या तांबूलाला आता जीआय टॅग मिळाला आहे. माहूरला येणारे भाविक तांबूलाचा प्रसाद घेतात. रक्त शुद्धीकरणासाठी तांबूल उपयुक्त आहे.

वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशननुसार जीआय टॅग लेबल आहे. त्याची नोंद सरकार दरबारी घेतली जाते. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या तांबूल या देवीच्या नैवेद्याला हा टॅग मिळाल्याने जगभरात आता माहूरच्या तांबूलाची ओळख होईल.

माहूर येथील श्रीरेणूकामाता हे साडेतीन शक्तीपीठांपैकी हे तिसरे पूर्णपीठ आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. हे मंदिर १३व्या शतकात देवगिरीच्या यादवकालिन राजाने बांधले आहे तसेच इ.स.१६२४ मध्ये शालिवाहन राजाने त्याचा जीर्णोद्धार केला. निसर्गसमृद्धीने नटलेल्या वातावरणात समुद्रसमाटीपासून एक हजार आठशे फूट उंच असलेल्या गडावर रेणूकामातेचा वास आहे.
माहूरच्या देवीच्या नवरात्राचा व्हिडिओ इथे पाहता येईल. त्यात तांबूल कसा होतो याची प्रक्रियाही आहे.
माहूरच्या देवीची सविस्तर माहिती खालील व्हिडिओत पाहा







