`अतुलनीय` हा व्यक्तिचित्रसंग्रह आहे. त्यात मराठवाड्याचा म्हणून एक वैशिष्ट्यगुण आहेच. `पुस्तकातून वाचलेली माणसे गेली कुठे` हा सवाल मनात जागता राहून कागदावर उतरलेली ही माणसं आहेत. वरकरणी सामान्य भासणा-या या माणसांत एक प्रकारचं असामान्यत्व आहे. त्यांच्यातल्या माणुसकीचे गहिरे रंग लेखक अतुल अविनाश कुलकर्णी यांनी उलगडले आहेत.

Atul Kulkarni
`महादू शिपाई` म्हणजे शाळेचा अविभाज्य भाग. नव्या पोरांमध्ये असलेली शाळेची भीती घालवायला तो तयार असायचा. मुख्याध्यापकही त्याचे ऐकत असत.

`भुताटकीचा भानू` ऐकताना, गाव भुताखेताच्या कथांत कसा रंगतो ते ऐकता येते.

ही व्यक्तिचित्रं ऐकताना, तो परिसर डोळ्यांसमोर उभा राहतो. अतुल कुलकर्णी यांच्या कथा सादर केल्यात मंदार कुलकर्णी यांनी.

mandar kulkarni
ही व्यक्तिचित्रं खालील लिंकवर ऐकता येतील.







