प्रतीक चव्हाण
———————-
नॉट ओन्ली पॉलिटिक्स
देशाप्रमाणेच महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फुटीनंतर आता राज्य विधानसभेची निवडणूक आणि आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात नेमकी कशी रंगते त्याबाबत अंदाज बांधले जात आहेत.
महाराष्ट्रातील २०२४ च्या निवडणुकीला १५-१६ महिने शिल्लक आहेत, त्यातच मागच्या २०१९ च्या निवडणुका व राजकीय परिस्थितीचा चा विचार करायला गेल्यास २०२३ पर्यंत ची राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत यात बरीच उलथा पालथ आपल्याला झालेली दिसेल. बदललेली राजकीय समीकरणं, युत्या-आघाड्या, आणि गटातटाचं राजकारण यातून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता अगदीच ढवळून निघाली आहे. २०१९ व येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकांमध्ये कोणते असे बदल झालेत व महाराष्ट्रातील मतदार जनता कोणते मुद्दे लक्षात ठेवून मतदान करतील यावर एक नजर.
राज्यात २०१९ ची राजकीय परिस्थिती लक्षात घेता तेव्हा राज्यात भाजप- शिवसेना यांची युती होती व दुसऱ्या बाजूला विरोधात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती असं करून हे मोठे चार पक्ष निवडणुकीला सामोरे गेले व अनेक छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते असं असताना विधानसभेतील २८८ जागांपैकी, भाजप- शिवसेना युतीच्या(१०५-५६= १६१) जागा निवडून आल्या व काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या (५४-४४=९८) जागा निवडून आल्या व राज्यातील अनेक छोटे पक्ष जसे की बहुजन विकास आघाडी यांच्या ३, aimim यांच्या २, समाजवादी पक्षाच्या २, प्रहार जनशक्ती पक्षाच्या २, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा १, शेतकरी कामगार पक्षाचा १, स्वाभिमानी पक्षाचे २, जन सुराज्य शक्तीचा १, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, आणि अपक्ष च्या१३ अशा जागा निवडून आल्या होत्या. पण निवडणुकी नंतर भाजप- शिवसेना यांची युती तुटली व शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत जाऊन महविकास आघाडी ची स्थापना केली व उद्धव ठाकरे यांनी त्या सरकार मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अडीच वर्ष महाविकास आघाडी ने सरकार चालवलं असे असताना २१ जून २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० अमदरांचं बंड झालं त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडून त्याचे २ गट झाले व एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केलं व मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच देवेंद्र फडणवीस या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री झाले व शिवसेनेतील ठाकरे गटातील १५ आमदार महाविकास आघाडीत राहुन विरोधी बाकावर बसले व त्याच्या एका वर्षानंतर म्हणजेच २जुलै २०२३ ला अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेउन शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामिल झाले त्यानंतर उपमुख्यंत्री पदाची शपथ घेत त्यांच्यासोबत आलेल्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ही झाली २०१९-२०२३ पर्यंत ची बदललेली राजकीय समीकरणं यावरून आपण जाणून घेऊयात की मतदार येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या निकषांवर मतदान करू शकते. शिवसेना (उ.बा.ठा ) यांच्याकडे प्रचंड सहानुभूती असून मुंबई, कोकण व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील बालेकिल्ल्यांमधे लोकांची पसंती उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, दूध व सहकार पट्ट्यातील मतदार हे पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस चे मतदार असून जरी राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी शरद पवारांकडे असलेली सहानुभूती या कारणाने अजित पवार व शरद पवार यांच्या मध्ये रंगत लढाई शकते तसेच उत्तर महाराष्ट्रातील जनता ही अनेक वेगवेगळ्या पक्षांना मतदान करते तसेच विदर्भाची माणसं ही विकासकामांना जास्त प्राधान्य देईल कारण इकडे असणारी जनता ही अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील जनतेपेक्षा खुप मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित आहेत त्यामुळे समृध्दी महामार्ग सारखे मोठे महामार्ग जे थेट विकासकामांना रस्ते मोकळे करून देते, विदर्भाची अनेक गावं त्यामुळे मुंबई पर्यंत अनेक जिल्ह्याला जोडली गेली आहेत त्यामुळे विदर्भाचे अनेक लोकं ज्या देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्यामुळे हा समृध्दी महामार्ग होऊ शकला त्यांचा भाजप या पक्षाला पसंती देतील, भाजप चा प्रभाव महाराष्ट्रातल्या अनेक वेग- वेगळ्या जिल्ह्यांमध्ये असून शहरी भागात त्यांचे अनेक मतदार पसंती देतात, मुंबई व त्या आजूबाजूच्या अनेक अमराठी व उत्तर भारतीय मतदार हे भाजप ला मत देतील, भाजपच्या बहुजन लोकातील गोपीनाथ मुंडे यांच्यापासून चालत असलेल्या मा.ध.व पॅटर्न अर्थातच (माळी. धनगर. वंजारी) या लोकांची अनेक मतं ही पारंपरिक आहेत, तसेच मराठवाड्यातील नांदेड, विदर्भासह त्यातील अनेक जिल्हे हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार असून काँग्रेसला इथे अनेक मतदार मत देतील तसेच राहुल गांधी यांची झालेली भारत जोडो यात्रा व त्याला आलेला जनतेचा प्रतिसाद हेदेखील मतदान करताना कळीचे मुद्दे ठरतील. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हिंदुत्वाची मतं भेटतील तसेच ठाणे जिल्ह्यातील असलेली एकनाथ शिंदे यांची पकड व त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीला सामोरं जावं लागेल त्यामुळे सहानुभूतीला उत्तर हे कामातून देण्याचं काम एकनाथ शिंदेंना यांची शिवसेना करेल तसेच महिलांना ५०% सवलत एस्टीचा प्रवासात दिल्याने अनेक महिला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदार करतील, असाही एक प्रवाद आहे.
मंडळीनो राजकारणात एक अधिक एक बरोबर दोन असे गणित कधीच नसते. मी आत्ता सांगितलेला इतिहासाचा आणि वर्तमानाचा पट जुळविला तरी, भविष्यात आणखी चित्र बदलू शकते. नवे विषय राजकीय पटलावर चर्चेत येऊ शकतात. त्यावर राजकारणाचे वारेही दिशा बदलू शकतात. तूर्तास इतकचं.
पुन्हा भेटू रामराम…