छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक श्रीकांत सराफ यांच्या ‘तितर बितर’ या कादंबरीला यावर्षीचा बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ मराठी लेखक कै. बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने ‘बी. रघुनाथ स्मृती सोहळ्याचं आयोजन शनिवारी अर्थात नऊ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरात तापडिया रंगमंदिरात करण्यात आलं आहे. त्यात पुरस्कार प्रदान केला जाणारंय.
पुण्याच्या देशमुख आणि कंपनीनं ही कादंबरी प्रकाशित केली आहे. या राजकीय कादंबरीची सध्या जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राला तशी राजकीय कादंब-यांची मोठी परंपरा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत हा प्रवाह काहीसा संथ झाला होता. त्याला श्रीकांतरावांच्या कादंबरीने पुन्हा खळाळते केले आहे.
या कादंबरीवरील हा विशेष ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला आहे ऋग्वेदाज लॅँग्वेज स्टुडिओच्या वतीने
त्यातील सहभागी मान्यवर
कवी-समीक्षक – ऋषीकेश देशमुख
विनोदी लेखक -डॉ. रवींद्र तांबोळी
सिने-नाट्य अभिनेते, लेखक- धनंजय सरदेशपांडे
स्वत: कादंबरीकार, पत्रकार – श्रीकांत सराफ
सूत्रसंचालन – कवी-पत्रकार उत्तमकुमार इंदोरे
परिसंवादाची लिंक खालीलप्रमाणे
पत्रकार आणि साहित्यिक श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ ही कादंबरी सध्या चर्चेत आहे. एका राजकीय पक्षाचा उदय आणि त्याच्या आजूबाजूला सामान्य माणसांच्या आयुष्यात घडणारे, वरवर पाहता नगण्य वाटणारे पण खोलवर प्रभाव टाकणारे बदल अधोरेखित करते.
राजकीय सूचन करीत, एका शहराच्या राजकारणाचे प्रतिबिंब तिथल्या समाजजीवनात कसे पडते, यावर भाष्य करीत कादंबरी पत्रकारितेचा पटही उलगडते.
अधिक माहितीसाठी संपर्क: 7798509007
कादंबरी: तितर बितर
लेखक: श्रीकांत सराफ
प्रकाशक – देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
मूळ किंमत – ₹550/-
सवलतीत – ₹500/- (टपाल खर्चासहित)
Gpay – 7798509007
NEFT – a/c number – 50200056378909 (IFSC: HDFC0001793)