‘ इये मराठीचिये नगरी ‘
——————————-
‘इये मराठीचिये नगरी’
सांगू किती तिची थोरवी !!
‘सह्याद्री’च्या दऱ्याखोऱ्यात
उगवती असंख्य रानवेली
निर्झर-नद्यांच्या खळखळाटात म्हणती
‘मराठी असे आमुची मायबोली’
‘मराठी भाषे’चा महिमा
वर्णावा तरी किती
तिच्या समृद्धीमागे आहे
संत-महात्म्यांची मांदियाळी
तुक्या- नाम्याचे पवित्र अभंग
‘गीता’ सांगते ‘ज्ञानेश्वरी’
‘आधुनिक वाल्मिकी’चे गीत रामायण
निनादे ‘केशवसुतां’ची ‘तुतारी’
‘गर्जा क्रांती’ चा मंत्र देणारे
कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन
आनंदाने साजरा करू या
मराठी भाषा गौरव दिन
— श्रीकांत ना. कुलकर्णी
( २७ फेब्रुवारी २०२४)