Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

पाचवी माळ – मुंबईची ग्रामदेवता-मुंबादेवी

सीएसटी इमारतीच्या बांधकामासाठी हलवावे लागले मंदिर

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
October 14, 2021
in आजचा महाराष्ट्र
0
पाचवी माळ – मुंबईची ग्रामदेवता-मुंबादेवी

मुंबई या महानगरीचं नाव ज्या देवीवरून पडलं ती मुंबादेवी म्हणजे मुंबापुरीचं ग्रामदैवत. या देवीबद्दल ब-याच आख्यायिका सांगितल्या जातात. मुंबईतल्या कोळी बांधवांची ही देवी असून त्यांनीच तिची स्थापना केल्याचा इतिहास आहे. पूर्वीचे व्हिटी किंवा बोरीबंदर रेल्वेस्थानक म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटावर कोळी बांधवांनी या देवीची स्थापना केली होती. मात्र, रेल्वेस्थानकाची भव्य इमारत बांधण्यास सुरुवात झाल्याने तेव्हाच्या ब्रिटिश गव्हर्नरनं या मूर्तीची प्रतिष्ठापना अन्यत्र करण्याची विनंती केली. तेव्हा काही काळ ही मूर्ती आजच्या मेट्रो सिनेमाजवळील धोबीतलाव परिसरात होती व नंतर सध्याचं भुलेश्वरमधलं मंदिर उभारलं गेल्याचं स्थानिक सांगतात. हे मंदिरही किमान दोनशे वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं.
पौराणिक ग्रंथांनुसार मुंबादेवीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळं मुंबईला लक्ष्मीचं शहरही म्हटलं जातं. मुंबा देवी ही मुंबईची ग्रामदेवी असल्यानं मुंबईत राहणारे लोक शुभकार्य करताना तिचं स्मरण करतात. मुंबादेवी, समुद्रात येणा-या संकटांपासून संरक्षण करते, अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबा देवी मंदिर न्यासाची स्थापना करण्यात आली. आजही हा न्यासच मंदिराची देखभाल करतो. देवीचं मंदिर खूपच आकर्षक आहे. मातेची मूर्तीही खूपच आकर्षक आहे. मूर्ती नारंगी चेह-याची असून चांदीच्या मुकुटाने सुशोभित आहे. आगरी आणि कोळी बांधवांची देवीवर अपार श्रद्धा आहे. आता हे मंदिर कपडा बाजार, स्टील बाजार आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांनी वेढलं आहे. तिथं रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ही भरभराट देवीमुळंच असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. मुंबादेवीच्या शेजारीच मोरावर आरूढ झालेली अन्नपूर्णाही आहे. लक्ष्मी आणि अन्नपूर्णा म्हणजे जगण्याचाच मूळ आधार असल्यानं सा-या मुंबापुरीची भिस्त या आदिमाया, आदिशक्तीवर आहे.
देवीच्या नावाचा आता रस्ताही आहे आणि चौकही. त्यासाठी स्थानिकांनी दीर्घकाळ आग्रह धरला होता. या देवीवर केवळ स्थानिकांचीच नव्हे तर, बाहेरून उपजीविका करण्यासाठी या शहरात येणारेही या देवीवर श्रद्धा ठेवतात.

Tags: mumbadevimumbaiकोळीनवरात्रपाचवीमाळमुंबईमुंबादेवीव्हिक्टोरियासीएसटी
Previous Post

पुणे-मुंबई दरम्यान हेलिकॉप्टर कॉरिडॉर

Next Post

सहावी माळ – रेणुकेचे रूप असलेली मोहटादेवी

Next Post
सहावी माळ – रेणुकेचे रूप असलेली मोहटादेवी

सहावी माळ - रेणुकेचे रूप असलेली मोहटादेवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In