Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

पुण्याचे विमानतळ फक्त बारा तास खुले

पूर्ववत विमानसेवा डिसेंबरमध्ये होणार सुरू

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
October 30, 2021
in आजचे पुणे
0
पुण्याचे विमानतळ फक्त बारा तास खुले

पुणे : भारतीय हवाई दलाच्या अखत्यारित येत असलेले पुण्यातील लोहगाव विमानतळ तूर्त विमानसेवांसाठी सुरू झाले आहे. मात्र, सध्या ते फक्त बारा तास खुले राहणार आहे. विमानतळ चौदा दिवसांपासून बंद होते. अखेर शनिवारी विमानतळावरील हवाई प्रवासी वाहतूक सकाळी आठपासून पुन्हा सुरू झाली. ज्या कारणासाठी विमानतळ बंद होते ते धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी नोव्हेंबरमध्ये केवळ बारा तासच उड्डाणे होणार आहेत. पूर्वीसारखी विमान वाहतूक एक डिसेंबरपासून सुरू होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.
विमानतळावर सप्टेंबर २०२० मध्ये धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे २६ ऑक्टोबर २०२० पासून विमानतळावरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. पुण्याच्या या विमानतळावरून साधारण वर्षभर फक्त दिवसाच उड्डाणे होत होती. त्यानंतर धावपट्टीच्या महत्त्वाच्या कामासाठी १६ ऑक्टोबर सकाळी आठपासून ते ३० ऑक्टोबरला सकाळी आठपर्यंत प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उड्डाणे सुरू झाली. मात्र, ही सेवा फक्त बारा तासच सुरू राहणार आहे.
धावपट्टीच्या कामासह विमानतळावरील पायभूत सुविधा त्याचप्रमाणे अन्य महत्त्वाची कामे गेल्या पंधरवड्यात पूर्ण करण्यात आली. विमानतळाच्या प्रवेशद्वाराचा रस्ता रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच, टर्मिनल इमारतीतील सुरक्षा परिसरातही आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. या शिवाय प्रवाशांच्या तपासणीसाठी असणारे ‘स्कॅनर’ वाढवले आहेत. यामुळे उड्डाणपूर्वीच्या आवश्यक प्रक्रियेत प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

Tags: पुणेपुणेविमानतळलोहगावविमानविमानतळ
Previous Post

पतसंस्थेत पिस्तुलाच्या धाकाने दरोडा

Next Post

मोदींच्या हस्ते आद्य शंकराचार्यांच्या समाधीची पुनर्स्थापना

Next Post
मोदींच्या हस्ते आद्य शंकराचार्यांच्या समाधीची पुनर्स्थापना

मोदींच्या हस्ते आद्य शंकराचार्यांच्या समाधीची पुनर्स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In