बालकुमार अक्षर दिवाळी २०२१
मुलांना वाचनाची गोडी लागावी, त्यातून भाषा समृद्ध व्हावी, यासाठी बालकुमारच्या या दिवाळी अंकात मुलांसाठी खास वाचनसाहित्य आहे. त्यात सर्वांना आवडता चिंटू, बालकांत प्रसिद्ध असलेल्या दिवाकरांच्या नाट्यछटा हा ज्येष्ठ नाटककार प्रकाश पारखी यांचा लेख, पारावरचा रांजण ही महावीर जोंधळे यांची, तुळस ही विश्वास वसेकरांची कथा, डॉ. पंडित विद्यासागर यांना सांगितलेले वैज्ञानिकांचे किस्से, डॉ. रामचंद्र देखणे यांची वासुदेव माझे नाव, डॉ. न. म. जोशी यांची शाब्बास गुरूजी ही कथा या अंकात आहे. ग. ह. पाटील आणि त्यांची सुवर्णमहोत्सवी कविता या विषयावर डॉ. मंदा खांडगे, विनूची मिटींग ही सुदाम विश्वे, गोलूचा सत्कार ही रश्मी गुजरात यांची कथा वाचनीय आहे. डॉ. सुरेश सावंत, मकरंद गोंधळी, नंदकिशोर ठोंबरे, विनोद सिनकर, शशिकांत शिंदे, विलास कुलकर्णी, बी. आर. माडगुळकर यांच्या कविता या बालकुमार च्या दिवाळी अंकात आहेत. जागवू संवेदना ही बाळ पोतदार यांची चित्रकथा प्रेरणादायी आहे. जाहिरात विरहित अंक हे बालकुमार दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. मुख्य संपादक माधव राजगुरू असून संपादक श्रीकांत चौगुले तर, डॉ. दिलीप गरूड, सलील वाघमारे सहसंपादक आहेत. अंकाची पृष्ठे ६४ असून मूल्य ८० रुपये आहे.
https://youtu.be/GLFxmBDUx58







