Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

इफ्फीमध्ये सुमित्रा भावे, वामन भोसलेंना वाहणार आदरांजली

अभिनेते दिलीप कुमार, पुनीत राजकुमार आदींच्या जीवनकार्याला उजाळा मिळणार

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 20, 2021
in आजचा भारत
0
इफ्फीमध्ये सुमित्रा भावे, वामन भोसलेंना वाहणार आदरांजली

पणजी : देशातील ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून सुरू झाला. महोत्सवात अलीकडच्या काळात चित्रपट जगताने गमावलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना आदरांजली वाहण्यात येईल. या महोत्सवात त्यांचे प्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित करून त्यांच्या जीवन आणि कार्याला उजाळा दिला जाईल.
याशिवाय, प्रख्यात कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार, संचारी विजय आणि मल्याळम अभिनेते नेदुमुदी वेणू यांना, अनुक्रमे राजाकुमारा, नानु अवनाल्ला…अवलु आणि मारगम हे चित्रपट प्रदर्शित करून करून इफ्फी आदरांजली वाहणार आहे.
या महोत्सवात वास्तुपुरुष हा चित्रपट प्रदर्शित करून दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि चित्रपट संकलक वामन भोसले यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

प्रदर्शित केल्या जाणाऱ्या चित्रपटांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत :

कालपुरुष – आदरांजली – श्री. बुद्धदेव दास गुप्ता (दिग्दर्शक)-२००५ -बंगाली-रंगीत – १२० मिनिटे

देवदास-आदरांजली -श्री. दिलीप कुमार (अभिनेते )-१९५५-हिंदी-कृष्णधवल- दोन तास ३५ मिनिटे

मारगम-आदरांजली-श्री नेदुमुदी वेणू (अभिनेते )-२००३-मल्याळम-रंगीत-१ तास ४८ मिनिटे.

राजकुमार-आदरांजली – श्री पुनीत राजकुमार (अभिनेते)-२०१७-कन्नड-रंगीत- दोन तास २८ मिनिटे

नानु अवनल्ला…अवलु-आदरांजली -श्री. संचारी विजय (अभिनेते )-२०१५-कन्नड-रंगीत-१ तास ५५ मिनिटे

वास्तुपुरुष-आदरांजली -श्रीम. सुमित्रा भावे (दिग्दर्शिका)-२००२-मराठी-रंगीत-१५४ मिनिटे

बधाई हो-आदरांजली -श्रीम. सुरेखा सिक्री (अभिनेत्री)-२०१८-हिंदी-रंगीत-दोन तास 3 मिनिटे

वास्तुपुरुष-आदरांजली -वामन भोसले (चित्रपट संकलक)

नव्या पिढीतील ७५ सर्जनशील व्यक्तिमत्त्वांचा सहभाग

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आणि सर्जनशील प्रतिभा असलेली ७५ व्यक्तिमत्त्वे गोव्यात होत असलेल्या 52 इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत सुरु करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम देशातील नावनिर्मितीक्षम तरुण कलाकारांना आणि उमलत्या प्रतिभांना ओळखून त्यांना आणखी बहरण्याची संधी देईल.

या उपक्रमासाठी निवडलेली -उद्याची ७५ सर्जनशील मने- गोव्यात होत असलेल्या इफ्फीचा भाग असतील आणि त्यांना सर्व तज्ञ वर्गांमध्ये तसेच संवादात्मक चर्चा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल तसेच इतर अनेक उपक्रमांसह चित्रपट उद्योगातील आघाडीच्या व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करता येईल. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक उमेदवाराची प्रवास तसेच निवास व्यवस्था महोत्सवाच्या आयोजकांकडून केली जाईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी २२ ऑक्टोबर रोजी या अभिनव उपक्रमाची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, इफ्फीची ५२ वी आवृत्ती भारतभरातील उमलत्या युवा प्रतिभांना चित्रपट निर्माते आणि या उद्योगाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देईल

देशभरात घेण्यात आलेल्या एका स्पर्धेद्वारे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवा चित्रपट निर्मात्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी देशभरातून ४०० पेक्षा अधिक अर्ज सादर करण्यात आले होते.

या उपक्रमासाठी असलेले मुख्य परीक्षक मंडळ आणि निवड परीक्षक मंडळ असे :

मुख्य परीक्षक

प्रसून जोशी – प्रसिद्ध गीतकार आणि सीएफबीसीचे अध्यक्ष
केतन मेहता – प्रसिध्द दिग्दर्शक
शंकर महादेवन – प्रसिध्द भारतीय संगीतकार आणि गायक
मनोज वाजपेयी – प्रसिध्द अभिनेता
रसूल पुकुट्टी – ऑस्कर विजेते ध्वनी मुद्रक
विपुल अमृतलाल शाह – प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक

निवड परीक्षक
वाणी त्रिपाठी टिकू – निर्माती, अभिनेत्री आणि सीएफबीसी सदस्य
अनंत विजय – लेखक आणि चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते
यतींद्र मिश्र – प्रख्यात लेखक आणि इतर प्रकारांतील लिखाण करणारे तसेच चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते
संजय पूरण सिंग – चित्रपट निर्माता, उत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते
सचिन खेडेकर – अभिनेता, दिग्दर्शक

भारतीय सिनेमाच्या वैभवाचे दर्शन घडणार
भारतीय सिनेमाच्या वैभवाचे दर्शन घडवण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात India@75 या बॅनरखाली देशभरातील निवडक उत्तम १८ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सध्या सुरु असलेल्या देशव्यापी कार्यक्रमांचा एक भाग म्हणून याचे आयोजन होणार आहे.
या चित्रपटांमध्ये महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचा आगंतुक, एस. एस वासन यांचा चंद्रलेखा, विजय आनंद यांचा गाईड, तपन सिन्हा यांचा काबुलीवाला, डॉ. राजकुमार यांचा संध्या रागा, राज कपूर यांचा श्री420, के बालचंदर यांचा थनीर थनीर तसंच बाबू बँड बाजा, कासव यांचा समावेश आहे. भारताच्या समृद्ध चित्रपट परंपरेचे आणि विविधतेचे दर्शन घडवणारे हे चित्रपट आहेत.

India@75 अंतर्गत पुढील चित्रपटांचा समावेश आहे.:

आगंतुक-सत्यजित राय-१९९१-बंगाली

अंधाधुन-श्रीराम राघवन-२०१९-हिंदी

बाबू बँड बाजा-राजेश पिंजानी-२०११-मराठी

बेट्टडा हावू-एन. लक्ष्मीनारायण-१९८५-कन्नड

चंद्रलेखा-एस एस वासन-१९४८-तमिळ

चिदंबरम-जी. अरविंदन-1१९८५-मलयाळम

एगी कोना-बॉबी वाहेम्बगंम आणि मयपक्सना हरोम्बगंम-२०१९-मणीपुरी

गाईड-विजय आनंद-१९५५-हिंदी

जोयमोती-मंजू बोरा-२००६-आसामी

काका मुत्ताई-एम मणीकंदन-२०१४-तमिळ

काबुलीवाला-तपन सिन्हा-१९५७-बंगाली

कासव-सुमित्रा भावे-२०१५-मराठी

एयरलिफ्ट-राज कृष्ण मेनन-२०१६-हिंदी

संध्या रागा-डॉ. राजकुमार-१९६६-कन्नड

सागर संगमम-के विश्वनाथ-१९८३-तेलुगु

श्री420-राज कपूर-१९५५-हिंदी

सुजाता-बिमल रॉय-१९५९-हिंदी

थनीर थनीर-के बालचंदर-१९८१-तमिळ

Tags: इफ्फीचित्रपटपणजीबॉलिवूडभारतीय सिनेमामराठीसुमित्रा भावे
Previous Post

मुलांसाठी जाहिरात विरहित अंक

Next Post

भौगोलिक माहिती प्रणालीने ७५ टक्के ग्रामपंचायती सज्ज

Next Post
भौगोलिक माहिती प्रणालीने ७५ टक्के ग्रामपंचायती सज्ज

भौगोलिक माहिती प्रणालीने ७५ टक्के ग्रामपंचायती सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In