Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

ओटीटीसाठी हव्यात सशक्त कथा : सामंथा

चित्रपट महोत्सवात 'द फॅमिली मॅन' या वेबमालिकेवर झाली चर्चा

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 23, 2021
in आजचा भारत
0
ओटीटीसाठी हव्यात सशक्त कथा : सामंथा

पणजी : ‘द फॅमिली मॅन’ या वेबमालिकेतील ‘राजी’ची भूमिका सर्वात आव्हानात्मक होती. या भूमिकेची तयारी करण्यासाठी आपण अनेकांची मदत घेतली तसेच खास प्रशिक्षणही घेतले, अशी माहिती समंथा रूथ प्रभू यांनी दिली. समंथा ही तेलुगू आणि तमिळ चित्रपट सृष्टीतली नामवंत अभिनेत्री आहे. येथे झालेल्या 52 व्या इफ्फी दरम्यान आयोजित ‘क्रिएटिंग कल्ट आयकॉन्स: इंडियाज ओन जेम्स बॉण्ड’ स्वतःचे जेम्स बाँड विथ द फॅमिली मॅन’ या विषयावरील संवाद  सत्रात ती बोलत होती. 

‘द फॅमिली मॅन’ ही मध्यमवर्गीय भारतीय माणसाची एक उत्तम कथा आहे. नोकरीत कामाच्या ओझ्याने दबलेला आणि प्रचंड अपेक्षा बाळगणारे त्याचे कुटुंब अशी पार्श्वभूमी असलेला हा माणूस आपल्या जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतो.

ओटीटी मंचाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समंथा म्हणाली, ओटीटी या व्यासपीठाला सशक्त कथानकाची गरज असते आणि त्याचबरोबर पात्रांना सहानुभूतीची मागणी करणारा मंच आहे.

मध्यमवर्गीयांच्या जीवनातील विनोद माझी प्रेरणा : मनोज वाजपेयी

प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी मनोगतात म्हणाले की, “मी कधीच व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ करण्याचा प्रयत्न करत नाही. मी नेहमीच वास्तवात जगण्याचा आणि व्यक्तिरेखा जनतेतली  प्रतिनिधी वाटेल, याप्रकारे साकारण्याचा  प्रयत्न करतो. मध्यमवर्गीय भारतीयाच्या जीवनात विनोद पुरेपूर भरलेला आहे  आणि तो आपल्या सर्व पात्रांमागचा संदर्भ आणि प्रेरणा आहे.

‘द फॅमिली मॅन’ चे दिग्दर्शक राज निदिमोरू व कृष्णा डीके, जे राज आणि डीके नावाने  प्रसिद्ध आहेत, त्यांनीही  या सत्राला संबोधित केले.  संपूर्ण भारताला आपलीशी वाटेल अशी कथा साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

ओटीटी-बिग स्क्रीनमध्ये सहजसुंदर सहअस्तित्व : अपर्णा पुरोहित

अमेजॉन प्राइम इंडिया ओरिजनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी यावेळी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी टीम निर्मात्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना कथांची विचारणा करीत होती. पुढे त्या म्हणाल्या, ‘‘भारतामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये सहअस्तित्व ही संकल्पना अतिशय सुंदरपणे नांदते. त्याचप्रमाणे ओटीटी आणि मोठा पडदा यांचेही असेच सहअस्तित्व असेल. आकर्षक, खिळवून ठेवणारी सामुग्री- साहित्य नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करतो. आम्ही कलेच्या सामर्थ्यामुळे महामारीच्या सर्वात अवघड टप्प्यातही झपाट्याने वृद्धी करू शकलो.’’

या संवाद सत्राचे सूत्र संचालन अभिनेता अंकूर पाठक याने केले. सत्राच्या प्रारंभी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांच्या हस्ते संवादामध्ये सहभागी होत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद उपस्थित होते.

Tags: अपर्णा पुरोहितइफ्फीगोवादफॅमिलीमॅनपणजीभारतमनोज वाजपेयीसामंथारुथप्रभूसिनेमा
Previous Post

ओटीटी प्लॅटफॉर्म ही नव्या दमाच्या चित्रपट निर्मात्यांना उत्तम संधी

Next Post

सत्यजित रे यांचे चित्रपट निर्मात्यांना अखंड प्रेरणा देणारे

Next Post
सत्यजित रे यांचे चित्रपट निर्मात्यांना अखंड प्रेरणा देणारे

सत्यजित रे यांचे चित्रपट निर्मात्यांना अखंड प्रेरणा देणारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In