Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

औरंगाबादेत लस प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच पेट्रोल

नियमभंग करणा-या पेट्रोलपंपावर कारवाईचा इशारा

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 23, 2021
in आजचा महाराष्ट्र
0
औरंगाबादेत लस प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच पेट्रोल
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत सध्या नो व्हॅक्सिन-नो पेट्रोल हे अभियान सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय पेट्रोल दिले जात नाही. या निर्देशांचे पालन न करणा-या पेट्रोलपंपावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कारवाईही केली.
कोविड-19 अनुषंगाने आवश्यक असलेल्या शिष्टाचाराचे पालन करण्याच्या अटीवर आणि ग्राहकांचे कोविड लसीकरण झाल्याच्या खात्रीनंतर बाबा पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल मिळणार आहे.
कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाबा पेट्रोल पंपावर रविवारी कारवाई केली होती. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आणि बाबा पेट्रोल पंप मालक यांनी कोविड-19 अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बाबा पेट्रोल पंप सोमवारी खुला करण्यास परवानगी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी पेट्रोल पंप चालकांसह सर्व नागरिकांना केले.
औरंगाबाद शहर कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येताना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे, असे आवाहन बाबा पेट्रोल पंपचे मालक ब्रुझिन प्रिंटर यांनी केले. सुरूवातीला जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार पंपचे सील काढले. यावेळी पंपचे मालक प्रिंटर यांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत कोविड 19 अनुषंगाने पंपावर करावयाची प्रक्रिया पार पाडणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी चव्हाण यांना यावेळी दिली.
Tags: औरंगाबादकोविडपर्यटनपेट्रोलपंपसील
Previous Post

इलेक्ट्रिक वाहनांची भारत मोठी बाजारपेठ : नितीन गडकरी

Next Post

“कोई जिंदा है?” या डायलॉगचे दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी उलगडले रहस्य!

Next Post
“कोई जिंदा है?” या डायलॉगचे दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी उलगडले रहस्य!

"कोई जिंदा है?" या डायलॉगचे दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी उलगडले रहस्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In