नाशिक : शहरात ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दररोज कामाचा आढावा घेतला जात आहे. संमेलन अधिक चांगल्या पद्धतीने कसे होईल याबद्दल कार्यकर्त्यांना सूचना केल्या जात आहेत. दरम्यान, संमेलनगीताचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले असून ते चांगलेच गाजत आहे. अनेकांनी हे गीत मोबाइल रिंगटोन म्हणूनही ठेवले असून ते स्फूर्तिदायी बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आपणासही येथे हे गीत ऐकता आणि पाहता येईल.







