रत्नागिरी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहा डिसेंबरला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) येथील स्मारकास भेट देणार आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचा दौरा आहे.
राष्ट्रपतींच्या भेटी दरम्यानच्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दरम्यान, राष्ट्रपती तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर असून त्यात ते आंबडवेसह अन्य ठिकाणांना भेटी देणार आहेत.







