Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

प्राजक्ता माळी म्हणते, चलो नाशिक

नाशिक नगरी सजली, संमेलनस्थळी जाण्यासाठी मोफत बससेवा

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 1, 2021
in कविता/साहित्य
0
प्राजक्ता माळी म्हणते, चलो नाशिक

नाशिक : शहरात होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. संमेलनासाठी शहर सजले असून नाशिक शहराच्या विविध भागातून साहित्य संमेलनाच्यास्थळी बस सोडल्या जाणार आहेत. हा प्रवास मोफत असेल. हात दाखवून कुठेही बस थांबवता येईल. त्याचे मार्ग आणि वेळापत्रक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.
दरम्यान, अनेक सेलिब्रेटींनी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यात प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचाही समावेश आहे.

संमेलनात संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी मराठी कवितेतील दिग्गजांना मानाचा मुजरा करणार आहेत. माझे जीविची आवडी या कार्यक्रमातून हे सादरीकरण होणार आहे. संत रचनांपासून… स्वातंत्र्यवीर सावरकर… भा.रा. तांबे…कुसुमाग्रज… बोरकर… आरती प्रभू… ग्रेस… शंकर वैद्य…विंदा करंदीकर…मंगेश पाडगांवकर…शांताबाई शेळके…वसंत बापट असा एक काव्य-गीत-संगीतमय देखणा प्रवास यात असेल. काव्य, गीत, संगीताने सजलेली ही संमेलनाची पूर्वसंध्या असेल. तरुणाईला पुन्हा एकदा मराठी काव्य -संगीताकडे वळवणाऱ्या, कवी संदीप खरे आणि संगीतकार दिग्दर्शक सलील कुलकर्णी ह्यांचा, मराठी कवितेतील दिग्गजांना मानाचा मुजरा…सादरकर्ते कवी संदीप खरे संगीतकार सलील कुलकर्णी. यात गायक : हृषिकेश रानडे, विभावरी आपटे- जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी हे आहेत. काव्यवाचन करणार आहेत, चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे आणि सूत्रसंचालन असेल मिलिंद कुलकर्णी यांचे. वादक असतील आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ. सत्यजित प्रभू, राजेंद ढुरकर आणि अमर ओक.
दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.

 

Tags: नाशिकप्राजक्तामाळीमराठीमहाराष्टसंदीपखरेसाहित्यसंमेलन
Previous Post

सहकारी बँकांच्या कामकाजावर केंद्राची राहणार देखरेख

Next Post

अभिजात मराठी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
अभिजात मराठी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिजात मराठी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In