नाशिक : शहरातील कवी कुसुमाग्रज नगरीमध्ये भरलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारपासून सुरवात झाली. संमेलनानिमित्त विविध दालने रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यात महत्त्वाचे आहे अभिजात मराठीसाठी सुरू असलेल्या मोहिमेचे. यासाठी तयार केलेल्या समितीने दिलेला अहवाल आणि त्यासंबंधाने मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचे अनेक पुरावे सादर करण्यात आले होते. ते सारे या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. लेख, साहित्य, गाथा सप्तशती अशी अनेकविध माहिती इथं मिळते. समितीचे सदस्य प्रा. हरी नरके यांनी स्वतः या प्रदर्शनाची दिलेली माहिती मराठीचा अभिमान असणा-या सर्वांनी पहावी, ऐकावी अशी आहे.







