Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पुण्यात जग्वार विमानांच्या चित्तथरारक कसरती

हवाई दलाच्या तळावर राष्ट्रपतींनी केली संचलनाची पाहणी

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 7, 2021
in आजचे पुणे
0
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पुण्यात जग्वार विमानांच्या चित्तथरारक कसरती

राष्ट्रपतींची हवाई दलाच्या पुणे तळाला भेट
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ निमित्त मंगळवारी पुणे येथील हवाई दलाच्या तळाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सविता कोविंद यांचे आदरातिथ्य करण्याचा विशेष सन्मान प्राप्त झाला.


हवाई तळावर आगमन झाल्यानंतर, दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडचे हवाई दल अधिकारी कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विक्रम सिंग आणि दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडच्या हवाई दल पत्नी कल्याण संघटना (प्रादेशिक) च्या अध्यक्ष डॉ. (श्रीमती) आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर,पुणे हवाई दल तळाचे दल अधिकारी कमांडिंग एअर कमोडोर एच असुदानी हे राष्ट्रपतींना संचलनाची पाहणी करण्यासाठी घेऊन गेले. या संचलनामध्ये एसयू-30 एमकेआय विमान आणि ‘मेड इन इंडिया’आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होता. राष्ट्रपतींनी मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या चित्तथरारक हवाई कसरती पाहिल्या. ‘भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे’ दर्शविणारा ’75’ हा आकडा पुण्याच्या आकाशात साकारणारा जॅग्वार विमानाचा फ्लाय पास्ट हे हवाई कसरतींचे वैशिष्ट्य होते.


राष्ट्रपतींनी अत्याधुनिक एसयू -30 एमकेआय विमानाच्या सिम्युलेटरमधून ‘उड्डाण’केले आणि त्यांना लढाऊ विमानाची असामान्य क्षमता दाखवण्यात आली. हवाई तळावरून प्रस्थान करण्यापूर्वी, त्यांनी पुण्यातील हवाई दल तळाचा आढावा घेतला आणि हवाई कसरतींमध्ये सहभागी झालेल्या विमान दलातील सदस्यांशी आणि हवाई दलातील योद्ध्यांशी संवाद साधला.

Tags: जग्वारपुणेरामनाथकोविंदराष्ट्रपतीसंरक्षणसुखोईहवाईदल
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रपतींचा मानाचा मुजरा

Next Post

महागाई कमी करण्यासाठी सरकार सरसावले

Next Post
महागाई कमी करण्यासाठी सरकार सरसावले

महागाई कमी करण्यासाठी सरकार सरसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In