Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील फरशी काढणार

जुने रूप देण्याचा देवस्थान समितीचा निर्णय

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 9, 2021
in आजचा महाराष्ट्र
0
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील फरशी काढणार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील मार्बल आता काढले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबतचा निर्णय नुकताच घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यासंदर्भातील निविदा काढली आहे. मंदिरातील तापमान या मार्बलमुळेच वाढत असल्याचे उघड झाले आहे. पुरातत्त्व विभाग आणि ऐतिहासिक वारसा क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. अंबाबाई मंदिरातील मार्बल काढल्याने आता मंदिराला पुन्हा ऐतिहासिक रुप मिळेल.

सध्याच्या संगमरवरी फरशीखाली पूर्वीची दगडी फरशी आहे. हे काम १९७० ते १९७५ या कालावधीत झाल्याची सांगितले जाते. हे मार्बल काढणे जिकीरीचे आहे. ते काळजीपूर्वक काढावे लागणार आहे. त्याखाली असलेल्या मूळ रचनेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हातोडी आणि छन्नीचा वापर करावा लागणार आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काढलेल्या निविदेत तसा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.
मंदिरातील आर्द्रता कमी करण्यासाठी मुळची दगडी रचना उपयुक्त आहे, असे संबंधित तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मार्बल काढण्याबरोबरच वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी मेघडंबरी आणि दारांच्या आतील भाग ऑइल पेंटमुक्त केला जाणार असून त्याऐवजी दरवाजाला चांदीचे आच्छादन वापरले जाणार आहे.

दरम्यान, मंदिराच्या मूळ इमारतीवर एक हजार टनाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. तो लवकरात लवकर उतरुन घेण्याची गरज आहे. त्यामुळे मंदिरातील मोठी झुंबरे आणि त्यासाठी लावलेले लोखंडी रॉडही काढून घेतले जाणार आहेत.

Tags: अंबाबाईकोल्हापूरकोल्हापूरदेवीदेवीमहालक्ष्मी
Previous Post

महागाई कमी करण्यासाठी सरकार सरसावले

Next Post

चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती मूळ स्वरूपात

Next Post
चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती मूळ स्वरूपात

चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती मूळ स्वरूपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In