Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांत 88% वाढ

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 22, 2021
in आजचा भारत
0
तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांत 88% वाढ

नवी दिल्‍ली : सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरादरम्यान ही माहिती दिली.
‘गेल्या तीन वित्तीय वर्षांतील डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणातली वाढ बघता हा बदल त्यात प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते’, असे सांगून डॉ.कराड यांनी त्याविषयी सविस्तर माहिती दिली.
२०१८-१९
2,32,602
2019-20
3,40,025
2020-21
4,37,445

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत 2018-19 पासून डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात 88% वाढ झाली असल्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले.
डिजिटल व्यवहार मंच हा एक अखिल भारतीय मंच असून, ‘कधीही, कोठेही’ बँक सुविधा वापरण्याची सोय त्यामध्ये दिलेली असते. त्याप्रमाणे, केवळ राष्ट्रीय पातळीवरच माहिती गोळा केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने, प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पैसे देण्यासाठीचा भारताचा स्वतःचा मंच- यूपीआय – याला डिजिटल पेमेंटसाठी आवडता मंच म्हणून देशाने पसंती दिली आहे. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये 22 अब्जापेक्षा अधिक व्यवहार या मंचावर नोंदले गेले. गेल्या तीन वर्षांमध्ये यूपीआयने चौपट वाढ दर्शवली आहे. शिवाय, वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये AePS (म्हणजे ‘आधार’वर अवलंबित पेमेंट प्रणाली) आंतर-बँक व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षांच्या तुलनेत नऊ पटींनी वाढ झाली आहे, अशी माहिती डॉ.कराड यांनी दिली.

Tags: bhagwatkaraddigitalpaymentindialoksabha
Previous Post

पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचे मोदींकडून निमंत्रण

Next Post

२० यूट्यूब वाहिन्या, २ वेबसाइटवर बंदी

Next Post
२० यूट्यूब वाहिन्या, २ वेबसाइटवर बंदी

२० यूट्यूब वाहिन्या, २ वेबसाइटवर बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In