Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

जयंतीदिनी अटलबिहारी वाजपेयींना अभिवादन

सुशासन दिनानिमित्त विविध उपक्रम

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 26, 2021
in आजचा भारत
0
जयंतीदिनी अटलबिहारी वाजपेयींना अभिवादन

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात आयोजित सुशासन सप्ताहाच्या समारोप समारंभाला संबोधित केले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह तसेच केंद्रीय गृह सचिवदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी केलेल्या भाषणात, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की 25 डिसेंबरच्या दिवसाला वेगळे महत्त्वदेखील आहे. आपल्या देशातील दोन महान व्यक्तिमत्वांच्या स्मृतींशी हा दिवस जोडलेला आहे. भारतरत्न, पंडित मदनमोहन मालवीय यांची जयंती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाचा अभिमानास्पद वारसा जगासमोर आणण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली.
आधुनिक भारतात, खऱ्या अर्थाने सुशासन हा शब्द तळागाळापर्यंत ज्यांनी पोहोचविला त्या अटल बिहारी वाजपेयी यांचीदेखील जयंती आहे. वाजपेयी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशाच्या अस्मितेशी संबंधित असलेले आणि अनेक वर्षे रेंगाळत राहिलेले निर्णय घेण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. या संकल्पनेच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली आहे आणि हीच फार मोठी कामगिरी आहे.
शहा म्हणाले की 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पहिल्यांदाच लोकांना वाटले की ह्या सरकारचा उद्देश केवळ राज्य करणे हा नसून देशात परिवर्तन घडवून आणणे हा आहे.
विकासाची पद्धत सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक असावी आणि देशात असा कोणताही भाग शिल्लक राहू नये जिथे विकास घडलेला नाही एवढीच अपेक्षा लोकांनी सुशासनाकडून केली आहे असे ते म्हणाले. देशातील सरकारने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक प्रशासन, मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, संवेदनशीलता तसेच विश्वासार्हता, नाविन्य, स्थैर्य यांनी युक्त प्रशासन निर्माण करावे आणि हे प्रयत्न अशा पद्धतीने व्हावेत की जेणेकरून लोकांनी सरकारवर विश्वास ठेवावा आणि हे सरकार जनतेचे असावे या अपेक्षा लोकांच्या सुशासनाच्या मॉडेलकडून असतात. आम्हां सर्वांकडून लोकांना या सात अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की याआधी विकासाची व्याख्या वेगळीच होती, त्यात अनेक प्रकारचे विवाद होते. मात्र, मोदी सरकारने अत्यंत उत्तम प्रयत्न करून हे सर्व विवाद दूर केले. या सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात, हे सर्व विरोधाभास दूर करून आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यासोबतच, आम्ही अनेक दुर्लक्षित क्षेत्रांकडे लक्ष पुरवण्यासाठी कामे केली आहेत.

कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, संरक्षण, अंतर्गत सुरक्षा,सिंचन,ग्रामीण विकास,शहरी विकास, आदिवासी विकास अशा सर्व क्षेत्रांना लाभदायक ठरतील अशी धोरणे आखण्याच्या दिशेने मोदी सरकारने काम केले आणि त्यामुळे आधी असलेले सर्व विवाद आता संपले आहेत.

अमित शाह म्हणाले की पहिल्यांदाच मोदी सरकारने देशातील 2 कोटींहून अधिक लोकांना घरे देऊन देशासमोर एक लक्ष्य ठेवले आहे. देशातील सर्व घरांना वीजपुरवठा आणि शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी 14 कोटी घरांना स्वयंपाकाचा गॅस पुरवून महिलांच्या आरोग्यात सुधारणा करण्याचे देखील काम केले आहे. प्रत्येक घराला पिण्याचे पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट देखील डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल याची सुनिश्चिती करण्यात आली आहे. अगदी कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत देखील मोदी सरकारने, 2 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रती व्यक्ती 25 किलो अन्नधान्य मोफत पुरवून 80 कोटी लोकांचे भुकेपासून संरक्षण केले.

शाह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची समस्या खूप मोठी होती. त्यांनी सांगितले की सामान्यपणे, गरीब शेतकऱ्याला एका वर्षात केवळ 6,000 ते 8,000 रुपयांचे कर्ज घ्यावे लागते. कर्ज माफ करण्याऐवजी मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपये दिले जावेत असा निर्णय घेतला जेणेकरून त्या शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरजच लागणार नाही.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की धोरणे निश्चित करूनच आणि प्रशासनात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करूनच सुशासन निर्माण करता येऊ शकेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी ई-प्रशासन, नागरिकांची सनद, राष्ट्रीय ई-सेवा वितरण मूल्यमापन प्रणाली आणि सुशासन निर्देशांक यांना प्रोत्साहन देण्यासारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अमित शाह म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी कर्मयोगी अभियान सुरु केले आहे.सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मयोगी अभियानाची संकल्पना नीट समजून घेतल्याशिवाय आणि मूलभूत पातळीवर त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय सुशासन प्रस्थापित होणे शक्य नाही. निवडून आलेले सरकार धोरणे निश्चित करेल, नियम आणि कायदे तयार करेल पण त्यांची अंमलबजावणी अधिका-यांच्या हाती असते. आणि या अधिकाऱ्यांनी सरकारची भावना समजून घेऊन सरकारची धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी काम करायला हवे.

मोदींकडून गौरव
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली. आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,”आदरणीय अटलजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन”
अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहे. त्यांनी केलेल्या देशाच्या अत्युच्च सेवेने आम्ही प्रेरित झालो आहोत. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी केलेल्या विधायक कार्याचा लाखो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला.”

Tags: #pmamitshahaatalbihariatalbiharvajpeyeeindiamodirss
Previous Post

टाटा सोशल सायन्सेसला हवाय पीएचपी डेव्हलपर

Next Post

७५ युवा लेखकांना एनबीटीची फेलोशिप

Next Post
७५ युवा लेखकांना एनबीटीची फेलोशिप

७५ युवा लेखकांना एनबीटीची फेलोशिप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In