पुणे -१५ डिसेंबर २०१८
प्रख्यात हिंदी साहित्यिक उदयप्रकाश यांच्या `सुनो कारीगर` या हिंदी कवितासंग्रहाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन `हे कारागिरा` नावाने झाले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रख्यात साहित्यिक, अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांनी भूषविले. पत्रकार मंगेश मधुकर कुलकर्णी आणि टीकम शेखावत यांनी हा अनुवाद केला आहे. ऋग्वेदाज लॅँग्वेज स्टुडिओने त्याची निर्मिती केली आहे.
डॉ. लिंबाळे यांनी या प्रसंगी उदयप्रकाश यांच्या साहित्याचा पट उलगडला. डॉ. खडसे यांनी अनुवादाचे काम किती महत्त्वाचे आहे, त्याबाबत चिंतन केले.