Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उदघाटन

व्यक्ती व समूहांना सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 7, 2022
in स्कील इंडिया
0
स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उदघाटन

नवी दिल्‍ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) येत्या 10 ते 16 जानेवारीदरम्यान, स्टार्ट अप इंडिया-नवोन्मेष सप्ताह आयोजित केला जाणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या आभासी नवोन्मेष समारंभाचे आयोजन, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्तच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आले आहे. देशभरात स्वयंउद्यमशीलतेची व्याप्ती किती आहे त्यासोबतच, किती खोलवर ही उद्यमशीलता रूजली आहे, हे या सप्ताहात आपल्याला बघता येणार आहे.

स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहात विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. यात, विविध विषयांवर सत्रे असतील, असे की बाजारपेठ उपलब्धतेच्या संधी वाढवणे, उद्योजकांसोबत चर्चासत्रे, विविध राज्यात अवलंबल्या जाणाऱ्या उत्तम पद्धती, तंत्रज्ञान विषयक प्रदर्शने, कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंध असे विषय असतील.

या कार्यक्रमात, मोठे धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार, स्टार्ट अप्स आणि या क्षेत्राशी संबंधित जगभरातील व्यक्ती सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या सर्व क्षेत्रातील हितसंबंधी व्यक्ती आणि समूह यांनी या सप्ताहासाठी https://www.startupindiainnovationweek.in/ या लिंकवर जाऊन नोंदणी करावी आणि यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी श्री गौतम आनंद (मोबाईल : 9205241872, ईमेल : gautam.anand@investindia.org.in) यांच्याशी संपर्क साधावा .

Tags: indiaindustryinnovationskillindiastartups
Previous Post

अत्तर व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे

Next Post

अब्जावधी वर्षांच्या खडकांचे हैदराबादेत संग्रहालय

Next Post
अब्जावधी वर्षांच्या खडकांचे हैदराबादेत संग्रहालय

अब्जावधी वर्षांच्या खडकांचे हैदराबादेत संग्रहालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In