Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

अब्जावधी वर्षांच्या खडकांचे हैदराबादेत संग्रहालय

ओपन रॉक म्युझियममध्ये 33 विविध प्रकारचे खडक

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 8, 2022
in आजचा भारत
0
अब्जावधी वर्षांच्या खडकांचे हैदराबादेत संग्रहालय

हैदराबाद : देशातील पहिल्याच, ‘ओपन रॉक’ म्हणजेच खुल्या खडक संग्रहालयाचे उदघाटन हैदराबादमध्ये झाले. या संग्रहालयात, देशाच्या विविध भागातून आणलेले 35 प्रकारचे खडक असून, पृथ्वीच्या इतिहातील त्यांचे वय साडेपाच कोटी वर्षे ते 3.3 अब्ज वर्षे इतक्या काळातले आहे. तसेच, यातले काही खडक, पृथ्वीच्या गर्भात 175 किमी खोलवरचे आहेत तर, काही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आहेत.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआर- राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात वैज्ञानिकांसमोर भाषण केले. सर्वसामान्य लोकांना, माहिती नसलेल्या अनेक गोष्टींविषयी त्यांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी हे विशेष संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे.

या वेळी, वैज्ञानिकांशी संवाद साधतांना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की.आजच्या ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थांमध्ये, “बिग अर्थ डेटा” म्हणजे पृथ्वीशी संबंधित माहिती आणि आकडेवारीला अत्यंत महत्त्व आले असून, या आघाडीवर, भारत देखील मोठे योगदान देत आहे. पृथ्वी विज्ञानात भारताने केलेल्या प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला. नव्या भारतात, आत्मनिर्भर होण्यासाठी भू-विज्ञानाची देशाला मोठी मदत मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विज्ञानाची अभिनव प्रयोगांशी सांगड घतली तर सर्वसामान्य माणसांचे आयुष्य अधिक सुकर आणि सुखकर करता येईल, असे सांगत वैज्ञानिकांनी यासाठी चाकोरीबाहेरचा विचार करण्याची पद्धत अवलंबवावी, जेणेकरुन, सर्वसामान्य लोकांच्या समस्या विज्ञानाच्या मदतीने सोडवता येतील, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी, जितेंद्र सिंह यांच्या हस्ते, लखनौ आणि देहरादून शहरांसाठी भूकंप धोका मापन नकाशाचेही प्रकाशन करण्यात आले. हे दोन्ही नकाशे उत्तर प्रदेश आणि उत्तरखंडच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाला देण्यात आले आहेत.

Tags: earthhyderabadindiaopenrockmusiumrocks
Previous Post

स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उदघाटन

Next Post

सिनेमाची दुर्मिळ छायाचित्रे असलेली दिनदर्शिका उपलब्ध

Next Post
सिनेमाची दुर्मिळ छायाचित्रे असलेली दिनदर्शिका उपलब्ध

सिनेमाची दुर्मिळ छायाचित्रे असलेली दिनदर्शिका उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In