मुंबई – गणेशोत्सव हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा उत्सव. करोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून जल्लोषाला थोडी काळजीची किनारही आहे. मात्र, त्यामुळे मुंबईकरांच्या उत्साहात फारसा फरक पडलेला नाही. घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. मोदकांच्या नैवेद्याचा घमघमाट घरोघरी आहे. कोकणवासीय यंदाही गौरी-गणपतीसाठी गावाकडं गेले आहेत. ज्यांना जाता आले नाही ते मुंबईतल्या घरांतही पारंपरिक उत्साहाने उत्सव करीत आहेत.
दरम्यान, करोनामुळे काळजी घेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपण आता काळजी घेतली तर, करोना लवकर आटोक्यात येईल आणि त्यामुळे पुढील सण आपल्याला जल्लोषात साजरे करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.