महाराष्ट्राच्या विविधभागात शनिवारी पावसाने हजेरी लावली. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जोरदार पावसाने पिके नष्ट झाली आहेत. नाशिकमधील नांदगाव, मालेगाव, कळवण, जळगावमधील, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर आणि चोपडा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तर नंदुरबारमधील शहादा आणि अक्राणी इथे अतिवृष्टीची नोंद झाली. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.