चेन्नई : येथील सुप्रसिद्ध भगवान वडप्पललाणी दंडायुधपाणी भगवान मुरुगन मंदिरात कुंभाभिषेक उत्साहात झाला. त्यानिमित्त झालेल्या हवनसोहळ्यात पाच हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते. शिवपुत्र कार्तिकेयाला दक्षिण भारतात मुरुगन असे संबोधले जाते.

या सोहळ्यात महाआरती, कलशारोहण आणि त्यानिमित्ताने कुंभाभिषेक आदी विधी उत्साहात करण्यात आले. मुख्य पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवृंदाने विधी केला.








