Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

आनंदी जगण्याचा संदेश देणारा अवलिया

डॉ. अनिल अवचट यांचे निधन

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 29, 2022
in आजचे पुणे
0
आनंदी जगण्याचा संदेश देणारा अवलिया

पुणे : सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट अर्थात ज्यांना महाराष्ट्रातील त्यांचे चाहते बाबा या नावाने संबोधतात त्यांचे येथील पत्रकारनगर येथे राहत्या घरी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्यामागे मुक्ता आणि यशोदा आणि इतर कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक अशा विविध भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. 1969 साली त्यांचे पहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. माणसं या पुस्तकातून त्यांनी समाजातल्या मजूर वर्गात किंवा तळागाळात राहणाऱ्या माणसांना, स्त्रियांना काय दुःखं सहन करावी लागतात याकडे प्रभावीपणे जगाचे लक्ष वेधले.

केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मुक्तांगणला अगदी सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी आर्थिक मदत करून पाठराखण केली.

पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि मुख्य म्हणजे ओरिगामीतून विविध आकार साकारणं हा त्यांचा आवडता छंद. त्यातून स्वतः आनंद शोधता शोधता आबालवृद्धांना त्यांनी आनंदयात्रेत सहभागी करून घेतले.

Tags: anilawchatdranilawchatindiamaharashtraorigamypunewriter
Previous Post

जगाच्या बाजारात फक्त भारताचीच खिरा-काकडी

Next Post

नगरमधील रणगाडा संग्रहालय ठरतेय आबालवृद्धांचे आकर्षण

Next Post
नगरमधील रणगाडा संग्रहालय ठरतेय आबालवृद्धांचे आकर्षण

नगरमधील रणगाडा संग्रहालय ठरतेय आबालवृद्धांचे आकर्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In