Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

अरूण जाखडे यांचे प्रकाशनविश्वात मोठे योगदान

स्नेह्याने जागविल्या प्रयोगशील प्रकाशकाच्या आठवणी

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
February 2, 2022
in कविता/साहित्य
0
अरूण जाखडे यांचे प्रकाशनविश्वात मोठे योगदान

पुणे : मराठी प्रकाशन विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अरुण जाखडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. विचारप्रवण, संशोधन, विवेकवादी साहित्य निर्मितीसाठी त्यांनी कायम आग्रह धरला. त्यातूनच त्यांच्या पद्मगंधा या प्रकाशन संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रासह देशातही वाढला.


जाखडे यांचे गाव अतिशय लहान आणि खेडे होते. गावात पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची २० वर्षे रानावनांत भटकण्यात, निसर्गाच्या सान्निध्यात गेली. हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात ते गेले. बोर्डिगमध्ये राहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले.


नगरमध्ये बी.एस्‌सी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ ‘कायनेटिक इंजिनिरिंग’मध्ये नोकरी केली. तिथून ‘ड्रिल्को मेटल कार्बाईड’मध्ये आले. मेटलर्जीच्या परीक्षा देणे शक्य व्हावे म्हणून ‘ड्रिल्को’ सोडून ते 1982 मध्ये ते पुण्याला ‘बजाज टेम्पो’त दाखल झाले. कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी जाखडे यांनी 1988 मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला. त्यानंतर त्यांनी साहित्यक्षेत्रात दमदार वाटचाल केली.


मराठी साहित्यात डॉ. रा. चिं. ढेरे, लावणी वाड्मय, श्री. व्यं. केतकर, र. धों. कर्वे, अगाथा ख्रिस्ती, भाषा प्रकल्प आणि नंतर अल्बेर कामूच्या साहित्यावर त्यांनी विशेष काम केले. ते स्वतःही उत्तम लिहित. त्यांची पाचरूट ही कादंबरी, एक काडी गवताची हा कथासंग्रह, इर्जिक हा ललित लेखसंग्रह, गावमोहर ही मुलांसाठीची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांनी बालवाड्मय, विज्ञान, इतिहास अशा विषयांवर विपुल लेखन केले. त्यांना राज्यशासन, महाराष्ट्र फाउंडेशनसह विविध पुरस्कार मिळाले.

Tags: arunjakhadebookfairbooksliteraturemaharashtramumbaipune
Previous Post

हुशार उमेदवारांनाच मिळणार रेल्वेच्या नोकऱ्या

Next Post

दक्षिण भारतातील भव्य मंदिरे पोहोचणार जगभर

Next Post
दक्षिण भारतातील भव्य मंदिरे पोहोचणार जगभर

दक्षिण भारतातील भव्य मंदिरे पोहोचणार जगभर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In