Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा

सांस्कृतिक मंत्रालयातर्फे 'भारतातील आदिम आणि स्थानिक भाषा' पुस्तक प्रकाशित

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
February 21, 2022
in आजचा भारत
0
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा

नवी दिल्‍ली : जगभरातून दर दोन आठवड्यांनी एक भाषा लुप्त होत असून हा आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे, याकडे युनेस्को नवी दिल्ली क्लस्टर कार्यालयाचे संचालक एरिक फाल्ट यांनी लक्ष वेधले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स येथे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) आणि युनेस्को नवी दिल्ली क्लस्टर ऑफिस यांच्या सहकार्याने सोमवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना:”बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर-आव्हाने आणि संधी”, असून बहुभाषिक शिक्षणात प्रगती करण्यासाठी आणि दर्जेदार शिक्षणाच्या विकासाला समर्थन देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या संभाव्य भूमिकेवर भर देण्यात आला आहे.
युनेस्को नवी दिल्ली क्लस्टर कार्यालयाचे संचालक एरिक फाल्ट यांनी सांगितले की, जगभरातून दर दोन आठवड्यांनी एक भाषा लुप्त होत असून हा आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे. शिक्षण व्यवस्थेत आणि सार्वजनिक क्षेत्रात केवळ काही शेकडा भाषांनाच ख-या अर्थाने स्थान देण्यात आले आहे, आज डिजिटल जगात100 हून कमी भाषा वापरल्या जातात, असेही ते म्हणाले. एखाद्या भाषेची हानी भरून न येणारी आहे आणि यातूनच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली.


प्रख्यात कवी, गीतकार आणि लेखक प्रसून जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी हलक्याफुलक्या विनोदाने, माहितीपूर्ण अनुभवांनी आणि त्यांच्या स्वतःच्या काही कवितांचे वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, मातृभाषा पुढे नेण्यासाठी युवा पिढीचा सहभाग महत्त्वाचा आहे.
आयजीएनसीएचे डीन प्राध्यापक रमेश ‘सी. गौर यांनी लिहिलेल्या ‘ भारतातील आदिम आणि स्थानिक भाषा’ यावरील पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Tags: cultureindiainternationalmotherlanguagedaymodisarkarnewdelhiआंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
Previous Post

शिवाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा ठरतोय आकर्षण

Next Post

मराठीला अभिजात दर्जासाठी मंत्री देसाई दिल्लीत

Next Post
मराठीला अभिजात दर्जासाठी मंत्री देसाई दिल्लीत

मराठीला अभिजात दर्जासाठी मंत्री देसाई दिल्लीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In