Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

लष्करप्रमुख नरवणे पुणे दौ-यावर

लष्कराच्या ताफ्यात विशेष स्वदेशी वाहने

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
April 13, 2022
in आजचे पुणे
0
लष्करप्रमुख नरवणे पुणे दौ-यावर

पुणे : लष्करप्रमुख मनोज नरवणे, लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह दोन दिवसांच्या पुणे दौ-यावर आहेत. त्याच्या या दौ-यात पुण्यातील बॉम्बे इंजिनीअर ग्रुप (बीईजी) येथे १२ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये लष्करप्रमुखांनी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या, क्यूआरएफव्ही अर्थात मध्यम क्षमतेची त्वरित प्रतिसाद लढाऊ वाहने, आयपीएमव्ही अर्थात लष्कर संरक्षित वाहतूक वाहने, टीएएसएल अर्थात टाटा अडव्हांस सिस्टीम लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित अत्यंत दीर्घ पल्ल्याची निरीक्षण यंत्रणा तसेच भारत फोर्ज या कंपनीद्वारे निर्मित मोनोकॉक हल मल्टीरोल माईन संरक्षित सशस्त्र वाहन या विशेष वाहनांची पहिली तुकडी लष्कराच्या सेवेत दाखल करून घेतली.


भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या उपक्रमाला बळकटी देण्याप्रती टाटा आणि भारत फोर्ज या कंपन्यांनी दर्शविलेल्या वचनबद्धतेबद्दल तसेच गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीय लष्कराच्या मदतीसाठी सतत केलेल्या कार्याबद्दल लष्कर प्रमुखांनी त्यांची प्रशंसा केली.

टीएएसएल आणि भारत फोर्ज या कंपन्यांनी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या या यंत्रणांचा भारतीय लष्करात समावेश झाल्यामुळे लष्कराच्या भावी कारवायांमध्ये परिचालनविषयक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या कार्यक्रमाला लष्कराच्या सेवेत कार्यरत असलेले तसेच सेवेतून निवृत्त झालेले अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: आत्मनिर्भरभारतइंडियापुणेमहाराष्ट्रमेकइनइंडियालष्करप्रमुखमनोजरवणे
Previous Post

जालियनवाला बागेतील हुतात्म्यांना पंतप्रधानांतर्फे आदरांजली

Next Post

‘डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज्’चे पुरस्कार जाहीर

Next Post
‘डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज्’चे पुरस्कार जाहीर

‘डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज्’चे पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In