Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

समर्थ रामदास स्वामींनी समाज जयेष्णू केला – स्वामी गोविंदगिरीजी

`समर्थव्रती..सुनील चिंचोलकर` ग्रंथाचे प्रकाशन

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
April 26, 2022
in आजचे पुणे
0
समर्थ रामदास स्वामींनी समाज जयेष्णू केला – स्वामी गोविंदगिरीजी

पुणे – `समर्थव्रती.. सुनील चिंचोलकर..`या दिलीप महाजन व डॉ.अपर्णा चिंचोलकर गोस्वामी लिखित व मोरया प्रकाशन प्रकाशित प्रेरणादायी चरित्र ग्रंथाचे प्रकाशन काल पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज, स्वामी श्रीकांतानंदजी महाराज व प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले.

श्री. महाजन यांनी प्रकाशक व लेखक अशा दुहेरी भूमिकेतील आपल्या पहिल्याच पुस्तकामागची संकल्पना विशद केली तर डॉ. अपर्णा यांनी आपल्या पित्याचा जीवनपट उलगडतानाची भूमिका स्पष्ट केली.

नामजोशी यांनी सुनीलजींच्या कार्याचे विशेषत्व सांगताना त्यांना सर्वतोपरी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणीचे, सुनीता चिंचोलकर यांचेही चरित्र प्रसिद्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली.

स्वामी श्रीकांतानंद यांनी सुनीलजींच्या कार्याचा गौरव करीत येणा-या काळात त्यांच्या कार्याची अधिक आवश्यकता असल्याचे नमूद करीत हे चरित्र अनेकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला..

स्वामी गोविन्ददेव गिरिजी महाराज या प्रसंगी बोलताना म्हणाले की ” इतर संतांनी हिन्दू समाज सहिष्णु केला तर समर्थांनी तो जयेष्णु केला” आणि येणा-या काळात आपल्या धर्मावर व संस्कृतीवर होणारी आक्रमणे थोपविण्यासाठी समर्थांच्या समर्थ विचारांची नितांत आवश्यकता आहे… देशभक्त सुनीलजींनी जीवनभर समर्थ विचारांच्या प्रसार प्रचाराचे काम केले म्हणूनच ते समर्थव्रती बनले…

सुनीलजींच्या या प्रेरणादायी चरित्राची आता नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले…

मोरया प्रकाशनाच्या गौरी देव यांनी सूत्रसंचालन केले तर, योगिनी आठल्ये यांनी स्टेजची व्यवस्था सांभाळली…

डॉ. राम साठे, संभाजीनगर चे श्री अनंत भागवत तसेच या चरित्र ग्रंथाच्या सल्लागार समितीमधील सर्वांचे सहकार्य लाभले. संपूर्ण वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

या सोहळ्याची क्षणचित्रे खालील लिंकवर पाहता येतील.

Tags: गोविंदगिरीजीमहाराजपुणेमराठीमहाराष्ट्रमोरयाप्रकाशनशिवसमर्थसमर्थभक्तसमर्थव्रतीसुनीलचिंचोलकर
Previous Post

इ-व्हेइकल्स दुर्घटनांची सरकार करणार चौकशी

Next Post

लष्करातर्फे पुण्यात “फन रन” उत्साहात

Next Post
लष्करातर्फे पुण्यात “फन रन” उत्साहात

लष्करातर्फे पुण्यात "फन रन" उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In