Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

पुणे पुस्तक जत्रेला प्रारंभ

केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागासहीत नामांकित प्रकाशन संस्थेची दालने

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
April 29, 2022
in आजचे पुणे
0
पुणे पुस्तक जत्रेला प्रारंभ

पुणे : पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रेला गुरुवारी पुण्यात प्रारंभ झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गेल्या 20 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पुणेकर रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या क्रीऐटी सिटीमध्ये भरलेल्या यंदाच्या या बुक फेअरचे उदघाटन प्रसिद्ध साहित्यिक अशोक कामत यांच्या हस्ते झाले.


पुणे बुक फेअर ही भविष्यात व्यापक चळवळ व्हावी आणि जीवन मुल्यांच दर्शन त्यातून घडावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यंदाच्या या प्रदर्शनात 40 हून अधिक दालने असून त्यात देशभरातील नामांकित प्रकाशन संस्थांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारचा प्रकाशन विभाग, जनगणना संचालनालय त्याचबरोबर आकाशवाणी आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यासारख्या सरकारी विभागांची दालने या प्रदर्शनात आहेत.
केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या दालनात 250 हून अधिक विविध विषयांवरील किमान 10 हजार पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान, आरोग्य आणि क्रीडा तसेच गांधी साहित्य बालसाहित्य. मान्यवरांची चरित्र त्याचबरोबर नेत्यांची गाजलेली भाषणे याबद्दलचे विपुल साहित्य या दालनात उपलब्ध असून त्यावर 10 टक्कयांपासून 90 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.


जनगणना संचालनालयाच्या दालनात 1872 पासून 2011 पर्यंतच्या जनगणनेविषयीची काही प्रकाशने पुस्तक आणि सी डी चा स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यावर 20 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे.  शिवाय या दालनाला भेट देणा-या साठी विशेष स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं असून प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. येत्या एक मेपर्यंत रोज सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे .

Tags: booksgovtbooksmaharashtraMarathipunepunebookfair
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जपानचा गौरव

Next Post

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासंबंधी अधिकृत ‘निर्देशपत्र’ आज

Next Post
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासंबंधी अधिकृत ‘निर्देशपत्र’ आज

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासंबंधी अधिकृत ‘निर्देशपत्र’ आज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In