मुंबई : केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरीक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी शनिवारी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सच्या युनिटला भेट दिली. तिथे त्यांनी आरसीएफच्या- सुफलाच्या 10:26:26 नवीन उत्पादित एनपीके श्रेणीचे उदघाटन केले.

आरसीएफने 2021-2022 मधे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मंत्री महोदयांनी कौतुक केले, कोरोनाच्या कठीण काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कर्मचा-चेही त्यांनी अभिनंदन केले. या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत संकल्पना सुनिश्चित करण्यासाठी आरसीएफने उचललेल्या विविध पावलांचेही त्यांनी कौतुक केले. आरसीएफ संशोधन आणि विकास विभागाने नव्याने विकसित केलेले उत्पादन विपुला 10:10:10 चेही त्यांनी उदघाटन केले.
सुफला 10:26:26 हे संतुलित खत असून ते सर्व पिकांसाठी वापरण्यास योग्य असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.

विविध प्रकल्पांची पाहणी

मंत्री खुबा यांनी आरसीएफच्या अमोनिया, युरिया, एसटीपी अशा विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अधिका-यांशी चर्चाही केली.









