नवी दिल्ली – इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे अलीकडेच योहानी डी सिल्वाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नेटिझन्सने श्रीलंकेची भाषा न समजताही गाणं आवडल्याचे म्हटले आहे. पण व्हायरल गाण्यामागे आवाज कोणाचा आहे?
व्लॉग, फॅशन हॅक्स, लिप-सिंक व्हिडीओ पासून इन्स्टाग्राम रील्समध्ये प्रत्येक गोष्टीपर्यंत, योहानीचे गाणे या व्यासपीठावर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. नंतर, योहानीच्या गाण्याची आवृत्ती पुढे तमिळ आणि बंगालीसह इतर भाषांसह रीमिक्स केली गेली. रिलीज झाल्यापासून चाहत्यांचं आवडतं असलेलं मणिके मागे हिथे ह्या गाण्याने एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. योहानी आणि सतीशन यांनी गायलेल्या ट्रॅकने आता यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूज ओलांडले आहेत. हा ट्रॅक जगभरात गाजतोय आणि अनेक सेलेब्सनी त्यावर इन्स्टाग्राम रीलदेखील बनवले आहेत.







