Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

दुबईतून चकत्यांच्या स्वरूपात आणलेले 11 किलो सोने जप्त

सफाई मशीनमधून आणलेले सोने जप्त

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
May 10, 2022
in आजचा भारत
0
दुबईतून चकत्यांच्या स्वरूपात आणलेले 11 किलो सोने जप्त

नवी दिल्‍ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या आठवड्यात लखनौ आणि मुंबई येथे सलग दोन वेळा यशस्वी कारवाई करून हवाई मार्गाने संघटीतपणे होणा-या सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत, ज्यात सोने लपवून नेण्याची सामान्य पद्धत वापरली होती.
कारवाईसाठी अचूक रुपरेषा निश्चित करून, दिनांक 06.05.2022 रोजी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर कार्गो कॉम्प्लेक्स, येथे आलेल्या मालाची तपासणी केली.
आयात माहिती कागदपत्रांत याची नोंद, “वेगवेगळे सुटे भाग आणि ड्रम प्रकाराचे सफाई मशीन” म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, 3.10 कोटी रुपये मूल्य असलेले 5.8 किलो सोने चकत्यांच्या आकाराच्या स्वरूपात आयात केलेल्या मशीनच्या दोन मोटर रोटर्समध्ये लपवून ठेवलेले आढळले. हा आयातदार दक्षिण मुंबईत असून त्याला तातडीने कारवाई करून अटक करण्यात आली आहे. या आयातदाराला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


लखनऊमध्ये देखील डीआरआय अधिका-यांनी मुंबईतील या जप्तीच्या एक दिवस आधी दिनांक 05.05.2022 रोजी आणखी एका जप्तीची कारवाई केली. त्या प्रकरणात देखील,डीआरआयने लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये “इलेक्ट्रिकल थ्रेडिंग मशीन” असल्‍याचे सांगितलेल्‍या आयात माल पकडला आणि तिथेही मशिनमध्‍ये सोन्याच्‍या चकत्‍या लपविल्‍याचे आढळले.
एकूण 5.2 किलो सोने, ज्याचे मूल्य 2.78 कोटी रुपये आहे,ते या प्रकरणांत जप्त करण्यात आले आहे.
तपासांच्या या मालिकेमुळे हवाई मालवाहू आणि कुरिअर मार्गाने मूळ परदेशी सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन कार्यपद्धती शोधण्यास मदत झाली आहे. अशा तपासण्यांमुळे डीआरआयची तस्करीच्या निरनिराळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची क्षमता मजबूत होत असते. 2021-22 या कालावधीत, महसूल गुप्तचर संचालनालय अधिका-यांनी एकूण 833 किलो तस्करी करून आणलेले सोने जप्त केले आहे, ज्याचे मूल्य 405 कोटी रुपये इतके आहे.

Tags: dubaigoldsmuglinglucknowmumbai
Previous Post

पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

Next Post

ग्रामीण डाक सेवकांची होणार भरती

Next Post
ग्रामीण डाक सेवकांची होणार भरती

ग्रामीण डाक सेवकांची होणार भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In