पॅरिस : फ्रान्समधील प्रसिद्ध वस्तूसंग्रहालयात असलेल्या मोनालिसा या जगप्रसिद्ध चित्रावर एका माथेफिरूने केक फेकला. तो महिलेच्या वेशात एका व्हिलचेअरवर आला होता. अचानक त्याने चित्राला केक फासला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पृथ्वीचे रक्षण करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा त्याने केला आहे.








