Wednesday, February 4, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

जनरल पांडे यांचा पहिलाच परदेश दौरा बांगला देशात

लष्करप्रमुखांचे शूरवीरांना अभिवादन

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
July 18, 2022
in आज जगात
0
जनरल पांडे यांचा पहिलाच परदेश दौरा बांगला देशात

ढाका : भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे तीन दिवसांच्या बांगला देश दौ-यावर आले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील उत्कृष्ट द्विपक्षीय संरक्षण संबंध वृद्धींगत करण्यासाठी जनरल मनोज पांडे, 18 ते 20 जुलै 2022 या कालावधीसाठी या बांगलादेशमध्ये असतील. लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.


18 जुलै 2022 रोजी शिखा अनिर्बन येथे पुष्पहार अर्पण करून 1971 च्या मुक्तिसंग्रामात सर्वोच्च बलिदान देणा-या शूरवीरांना आदरांजली वाहून लष्करप्रमुखांनी आपल्या दौ-याची सुरुवात केली. लष्करप्रमुख सुरक्षा आस्थापनांच्या वरिष्ठ अधिका-यासोबत बैठका आणि संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करतील. बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मारक संग्रहालयाला भेट देऊन ते श्रद्धांजली अर्पण करतील.
आपल्या दौ-याच्या दुस-या दिवशी लष्करप्रमुख मीरपूरच्या डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. त्यानंतर ते बांगलादेशातील एक प्रमुख संस्था जी संयुक्त राष्ट्रांच्या विविध शांतता मोहिमांमध्ये रोजगारासाठी शांती सैनिकांना प्रशिक्षण देते अशा “बांग्लादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस सपोर्ट अँड ऑपरेशन ट्रेनिंग (BIPSOT)” या संस्थेला भेट देऊन या सदस्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते मीरपूर येथील बंगबंधू ​​लष्करी संग्रहालयाला भेट देतील.
लष्कर प्रमुखांच्या भेटीमुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील. दोन्ही देशांमधल्या सामायिक मुद्द्यांवर समन्वय आणि सहकार्य निर्मितीसाठी ही भेट महत्त्वाची ठरेल.

Tags: इंडियाजनरलमनोजपांडेभारतबांगलादेशभारतीयलष्कर
Previous Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत

Next Post

गौरवशाली सेवेनंतर पाणबुडीला सायंकाळी दिला पारंपरिक निरोप

Next Post
गौरवशाली सेवेनंतर पाणबुडीला सायंकाळी दिला पारंपरिक निरोप

गौरवशाली सेवेनंतर पाणबुडीला सायंकाळी दिला पारंपरिक निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In