मुंबई : अभिनेते प्रशांत दामले यांचा १२ हजार ५०० वा विक्रमी प्रयोग आज, रविवारी श्री षण्मुखानंद सभागृहात दुपारी रंगत आहे. मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
विक्रमवीर दामले यांचे रंगभूमीवरील कार्य कौतुकास्पद असल्याची साऱ्या मराठीजनांची भावना आहे.







