मुंबई – ‘वाळवी’ म्हणजे लाकूड पोखरणारी कीड. त्याचा संदर्भ या चित्रपटाच्या नावात आहे. नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सध्या चर्चेत आहे. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय आहे,, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट १३ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहेत.







