Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

युवकांनी बांधला बंधारा

सशक्त देशाच्या विकासासाठी रासेयो ची शिबिरे ही उपयुक्त  - आनंद छाजेड

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
February 14, 2023
in आजचे पुणे
0
युवकांनी बांधला बंधारा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी ,पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक २जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत हे मु.पो.सुदुंबरे ता. मावळ’ जिल्हा पुणे येथे पार पडले. “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ‘युवकांचा ध्यास ग्राम -शहर विकास’ या संकल्पनेतून शिबिराचे उद्घाटन खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड प्राचार्य डॉ. संजय चाकणे सुदुंबरे गावचे ग्रामसेविका सौ सानिका शिंदे यांच्या हस्ते तर समारोप खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला.

या शिबिरात स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता, देवस्थान परिसर स्वच्छता, संतश्रेष्ठ जंगनाडे महाराज मंदिर परिसर स्वच्छता,चौक, शाळा, अंगणवाडी आणि मुख्य रस्ते यांची स्वच्छता केली. तसेच सुदवडी गावच्या ओढ्यावर स्मशान भुमी जवळ एक बंधारा बांदला तसेच दुसरा बंधारा सुदुंबरे गावाच्या दक्षिणेकडे स्मशान भूमी जवळ या बंधार्‍यामध्ये साधारणपणे सात थरांची उंची असलेल्या पंचवीस ते तीस फूट लांब केली. नदीपात्रात काम करणाऱ्या उपस्थित काही ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले म्हणून बंधाऱ्याचे काम हे अतिशय छान झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ओला कचरा सुका कचरा जनजागृती प्रात्यक्षिके केली. तसेच जवळच असलेल्या श्री. क्षेत्र भंडारा डोंगरावर जाऊन स्वच्छता अभियान राबविले. यासारखी श्रमदानाची कामे करतानाच अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्राम सर्वेक्षण, आरोग्य विषयक जनजागृती, मतदान जनजागृती, शिक्षण विषयक जनजागृती, स्त्री भ्रूण हत्या, मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक हे स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन केले. तसेच मतदान जनजागृती विषयक चौका चौकात नवनवीन विषयांची पथनाट्ये केली यावेळी ग्रामस्थाचा मोठा प्रतीसाद मिळाला.तसेच मतदान सर्वेक्षण हे घरोघरी जाऊन केले, तसेच यावेळी सर्व स्वयंसेवक यांनी ग्रामस्थांच्या घरी एक वेळचे जेवण केले.त्यामुळे ग्रामस्थांचे एक चांगले नाते तयार झालेले पाहायला मिळाले. जेवणावळी काही भौगोलिक विषयाशी निगडित सामाजिक ,आर्थिक, शेती ,शिक्षण , विषयक प्रश्नावली भरून घेऊन सखोल माहिती मिळवली. तसेच शिबिरात सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे नवं नवीन सकल्पनेप्रमाणे हे हृदयी ते ते हृदयी यामध्ये स्वयंसेवकांनी आपले आपले मीत्राची सखोल माहिती घेतली, त्या माहितीचे मनमोकळे पणाने केलेला संवाद चे लिखाण केले, ते लिखाण कार्यक्रम अधिकारी याकडे सुपूर्द केले त्याचे एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारची कामे केली. शिबिरामध्ये बौद्धिक सत्रात ग्रामसेविका सानीका शिंदे यांनी ग्राम विकासात ग्रामसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांचे कार्य तसेच ग्राम प्रशासकीय संधी या विषयावर व्याख्यान दिले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या जिल्हा समन्वयक सारिका मोहोळ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतुन व्यक्तिमत्व विकास,प्रा.नितीन पहिलवान यांनी धर्मवीर संभाजी महाराज, तसेच शिबीर काळात प्रा. महादेव रोकडे यांनी साहित्य निर्मिती, प्रा. अरुण शेलार यांनी उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शिबीर काळात शारीरिक फिटनेस साठी , योगा, व्यायाम , तसेच प्रार्थना, ध्यान, या विषयीची माहिती देत शिबीर काळात नियमित दिनचर्या नुसार उपक्रम पार पाडले .


समारोप प्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी आपल्या मनोगततून,’संघर्ष करा ,कष्ट घ्या, यशस्वी व्हा, कष्टाशिवाय पर्याय नाही हा स्वयंसेवकांना संदेश दिला. शेवटी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.संजय चाकणे यांनी गरिबीची लाज बाळगू नका , नव नवीन शिक्षण कायम घेणे गरजेचे आहे असे स्वयंसेवकांना अनुभवातून मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी, समिती सदस्य, कर्मचारी यांचा शिबीर काळात उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली म्हणून सन्मान केला. खडकी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, संचालक राजेंद्र भुतडा, संचालक रमेश आवस्थे , माजी पालक प्रतिनिधी अनिल भिसे, मा.विशाल जाधव, प्रा.अरुण शेलार , प्रा.महादेव रोकडे, चंद्रकांत जंबुकर, दत्तात्रय गाडे, नाथा मामा गाडे, शांताराम दरेकर, गजानन कराळे , माणिक गाडे, विजय गाडे, दत्तात्रय गाडे यांची उपस्थिती होती, यावेळी ग्रामस्थांनी खडकी शिक्षण संस्था आणि महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाचे कौतुक केले.
सांगता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश काटकर प्रस्तावित ऋषिकेश गाडे यांनी केले तर आभार श्रेयश काकडे या स्वयंसेवकांनी मानले. तसेच शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचेता दळवी, डॉ.निलेश काळे प्रा.भागवत शिंदे, आणि समिती सदस्य डॉ.शैलेंद्र काळे, सेवक रमेश शेलार, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Tags: खडकीशिक्षणसंस्थाटीजेकॉलेजपुणेविद्यापीठ
Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणादायी चरित्र पुस्तकरुपात

Next Post

चिमणी दिन विशेष…

Next Post
चिमणी दिन विशेष…

चिमणी दिन विशेष...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In