पुणे : प्रसिद्ध पत्रकार, सूत्रसंचालक आणि कवी उत्तमकुमार इंदोरे सरांचं कवितांचं पुस्तक ६ मे २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. हार्ट (एचईएआरटी) प्रकाशनचं हे पहिलंवहिलं साहित्य आहे. विनोद शिंदे या धडाडीच्या प्रेरक उद्योजक-कलावंतांचा हात या कलाकृतीवर फिरला आहे.

भाव-भावना, संघर्ष, प्रेम, प्रगल्भ अनुभव असा सारा मिलाफ या कवितासंग्रहात आहे. पत्रकार म्हणून उत्तमकुमार यांनी पाहिलेली माणसांची दुनिया, व्यक्ती म्हणून केलेला संघर्ष, आणि दुनिया इकडची तिकडं झाली तरी शब्दांचं बोट सुटू न दिलेले कवी उत्तमकुमार त्यांच्या पहिल्या वहिल्या कलाकृतीतून व्यक्त होताहेत. त्या आधी दैनिकांच्या सदरांतून त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीची जाणकारांना ओळख आहेच.

या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आणखी एक योगायोग जुळून येतो आहे. तो म्हणजे हार्ट (एचईएआरटी) प्रकाशनचं हे पहिलंवहिलं साहित्यविषयक पुस्तक आहे. विनोद शिंदे या धडाडीच्या प्रेरक उद्योजक-कलावंतांचा हात या कलाकृतीवर फिरला आहे. छपाई, डिझाइन, आयोजन अशा चौफेर क्षेत्रात विनोदजी कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतही स्टॉल लावत आहेत. नव्या दमाच्या लेखक-कवींचा शोध घेत आहेत.

हा सोहळा रंगणार आहे, पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या देखण्या गणेश हॉलमध्ये. ६ मे २०२३ रोजी सकाळी दहाला प्रकाशन आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर, सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे.
सुप्रसिद्ध लेखक नितीन थोरात, अभिनेते व पत्रकार किरण वाजगे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
पत्रकार – कवी उत्तमकुमार यांच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनसोहळ्यानिमित्त त्यांच्या काही गाजलेल्या कविता त्यांच्याच आवाजात खालील लिंकवर ऐकायला विसरू नका…







