पुणे – श्रीपाद ब्रह्मे आणि नेहा लिमये यांनी लिहिलेल्या, अमलताश प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. सदानंद मोरे यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी संध्याकाळी पुण्यात झाला..
समारंभात बोलताना श्रीपाद ब्रम्हे आणि नेहा लिमये यांनी हे पुस्तकाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

पहिल्याच दिवशी पहिली आवृत्ती संपली.

पुस्तकाविषयी –
पुस्तकाचे नाव : लिहू या बिनचूक मराठी
लेखक : श्रीपाद ब्रह्मे, नेहा लिमये
प्रकाशक : अमलताश बुक्स, पुणे
मुखपृष्ठ : रविमुकुल
पाठबळ : गंगोत्री होम्स, पुणे
पुस्तकाची पृष्ठसंख्या : १०४
किंमत : १०० रु.
पुस्तकात काय? : मराठी भाषा बिनचूक कशी लिहायची याविषयी ‘मार्गदर्शक’ स्वरूपात, साधे-सोपे नियम तसेच काही लेखनसंकेत समजावून सांगणारी १४ विविध प्रकरणे. व्यावहारिक, दैनंदिन वापरातील शब्द अचूक लिहिले जावेत, वाक्यरचना मराठी शैलीची असावी याविषयी विशेष सोदाहरण मार्गदर्शन. पुस्तकाच्या शेवटी अधिक माहितीसाठी व्याकरणाच्या, शब्दसिद्धीच्या पुस्तकांची, संकेतस्थळांची यादी.
या सोहळ्यात झालेली भाषणं मराठी भाषा, तिचं महत्त्व या बाबत चिंतन करणारी आहेत. सोहळ्याची क्षणचित्रे खालील लिंकवर पाहता येतील.







